आश्वी बुद्रुक येथे श्री दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन
◻️ ५० हुन अधिक महिला आणि पुरूष सेवेकऱ्यानी नोंदवला सहभाग
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे दिनांक ९ ते १६ डिसेंबर पर्यत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ दिंडोरी प्रणित गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे व गुरूपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त जयंतीनिमित्त गुरूचरित्र पारायण व यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पारायण सोहळ्यात गावातील ५० हून अधिक पुरूष व महिला सेवेकरी सहभागी झाले.
यावेळी श्री गुरूदेव दत्त नामाचा जयघोष करत पारायाणाची सुरूवात करण्यात आली. यात ग्रामदेवता सन्मान, मंडल मांडणी व अग्नी स्थापना करून स्थापित देवताचे हवन करण्यात आले. या पारायणस १०० हून अधिक महिला पुरूष सेवेकरी २४ तास पहारा देत आहे. यामध्ये माळ जप करणे, विना धारण करणे तसेच स्वामी चरित्र वाचण केले जात आहे.
गुरूचरित्र पारायण करणारी व्यक्ती ही खपु भाग्यवान असेत. अशी मान्यता आहे. श्री गुरूचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असुन ओवी संख्या ७,४९१ इतकी आहे. त्याची विभागनी ज्ञागकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड आदिमध्ये करण्यात आल्याची माहिती केंद्र मार्गदर्शक प्रा. आप्पासाहेब शेळके यांनी दिली.