जयहिंद लोकचळवळीकडून २१ ते २३ डिसेंबर दरम्यान कला महोत्सवाचे आयोजन

संगमनेर Live
0
जयहिंद लोकचळवळीकडून २१ ते २३ डिसेंबर दरम्यान कला महोत्सवाचे आयोजन 


◻️ हजारो विद्यार्थ्याचे एकाच वेळेस गीत गायन ; माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची माहिती


◻️ ७ हजार २०० विद्यार्थी विविध कलाविष्कार साकारणार 

संगमनेर LIVE | निरोगी व सुदृढ समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या जयहिंद लोकचळवळीच्या वतीने जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विद्यार्थ्याना व्यवसाय पूर्व कला - कौशल्याची संधी मिळावी याकरता २१ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२४ या काळामध्ये क्रीडा संकुल येथे भव्य कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये ७ हजार २०० विद्यार्थ्यांचा समावेश असून हे सर्व विद्यार्थी एकाच वेळेस देशभक्तीपर गीतगायन करणार असल्याची माहिती जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.

संगमनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत या कला महोत्सवाबाबत त्यांनी माहिती देण्यात आली. यावेळी समवेत बालभारतीचे विशेष अधिकारी डॉ. अजयकुमार लोंढे, प्रकाश पारखे, डॉ. नामदेवराव गुंजाळ उपस्थित होते.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. तांबे म्हणाले की, जयहिंद लोकचळवळ ही निरोगी व सुदृढ समाज निर्मितीसाठी काम करत आहे. या अंतर्गत सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असून विद्यार्थ्यांना व्यवसाय पूर्व कौशल्य मिळावे याकरता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे २१ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२४ या काळामध्ये भव्य कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कला महोत्सवाचे उद्घाटन शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या कला महोत्सवात विविध प्रकारची २० स्टॉल असून यामधून विद्यार्थ्यांना ओरिगामी, पेपर क्विलिंग, नारळाची करवंटी, बुरुडकाम, पतंग तयार करणे, कॅनव्हास पेंटिंग, निसर्ग चित्र, जलतरंग, कागदी फुलांची निर्मिती, स्क्रीन प्रिंटिंग, सौंदर्यप्रसाधने, पुष्पगुच्छ तयार करणे, रांगोळी रेखाटन, सायकल दुरुस्ती, प्रिंट मेकिंग, वारली, चित्रकला, मातीकाम, पपेट शो, क्लास आर्ट, अक्षरलेखन, रस्ता सुरक्षा, फायर सेफ्टी, व्यसन बंदी, झुंबा, वारकरी, याचबरोबर संगणकीय प्रशिक्षण असे वेगवेगळे प्रकारचे कला कौशल्य शिकवले जाणार आहे. याकरता राज्यभरातून आणि देशभरातून तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत.

या तीन दिवसाच्या कला महोत्सवात तालुक्यातील इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार असून या तीन दिवसात ७ हजार २०० विद्यार्थी कला कौशल्यांचे प्रशिक्षण घेणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना आयोजकांच्या वतीने साहित्य वाटप करण्यात येणार असून त्यांनी तयार केलेल्या वस्तू त्या विद्यार्थ्यांना स्वतःकडे घेऊन जाता येणार आहे.

यानंतर हे सर्व ७ हजार विद्यार्थी एक ताल एक सुरात बलसागर भारत होवो, सारे जहाँ से हिंदुस्तान हमारा, आणि उधळीत शीत किरणा हे तीन देशभक्तीपर गीते एकाच वेळेस सादर करणार असल्याचे प्रकाश पारखे यांनी सांगितले.

दरम्यान या कला महोत्सवात संगमनेर तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जयहिंद लोकचळवळीच्या वतीने करण्यात आले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात रंगणार कला महोत्सव..

कला आणि क्रीडा हे विषय विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून विद्यार्थ्यांना कृतिशील ज्ञानमळावे यातून हा भव्य कला महोत्सव होणार असून सहभागी विद्यार्थ्याना कलर कोड दिला जाणार आहे. त्यांना आवडीचे कौशल्य शिकवण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी असून सात हजार विद्यार्थ्यांचे समूह गान हे या कला महोत्सवाची वैशिष्ट्य ठरणार असल्याचे डॉ. अजय कुमार लोंढे यांनी म्हटले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !