जनतेच्या मनातील अपेक्षा पूर्ण करण्याला आमचे प्राधान्य - ना. विखे पाटील
◻️ मुख्यमंत्र्यानी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करणार
◻️ लाडकी बहीण योजनेतील महीलांच्या अर्जाची पडताळणी नाही, लवकरचं अनुदान २१०० रुपये
◻️ नागपूर अधिवेशनाला रवाना होण्यापुर्वी विखे पाटील यांनी घेतले श्री क्षेत्र निझर्णेश्वर महादेवाचे दर्शन
संगमनेर LIVE | राज्यातील जनतेन महायुती सरकारल मोठे पाठबळ दिले आहे. जनतेच्या मनातील अपेक्षा पूर्ण करणे हेच आमचे प्राधान्य असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करणार असल्याची माहिती ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
नागपूर अधिवेशनासाठी रवाना होण्यापुर्वी ना. विखे पाटील यांनी श्रीक्षेत्र निझर्णेश्वर येथे महादेवाचे दर्शन याप्रसंगी आमदार अमोल खताळ, प्रवरा बँकेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, संचालक रामभाऊ भुसाळ, तहसिलदार धीरज मांढरे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे
आदि याप्रसंगी उपस्थित होते.
याआधी लोणी बुद्रुकचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रोत्सवात त्यांनी ग्रामस्थांसमवेत सहभागी होवून दर्शन घेतले. यात्रेनिमित काढण्यात येणाऱ्या काठीची विधीवत पूजा ना. विखे पाटील आणि डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करून मिरवणूक काढण्यात आली.
माध्यमांशी संवाद साधताना ना. विखे पाटील म्हणाले की, राज्यातील जनतेन महायुतीला मोठा प्रतिसाद दिला. याचे एकमेव कारण म्हणजे मागील अडीच वर्षात सरकारने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्या नंतर राज्याला पुढे कसे घेवून जायचे याबबात निर्णय घेण्यास प्रारंभ केला आहे. प्रत्येक विभागासाठी शंभर दिवसांचा कृती आरखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असून तोच आमचा प्राधान्यक्रम भविष्यात असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये नवे उद्योग आणून युवकांना रोजगार निर्माण करून देणे हा माझा प्राधान्यक्रम असणार आहे. यासाठी जिल्ह्याचा औद्योगिक विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्यावर काम सुरू करायचे आहे.
पुण्यशलोक अहील्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाला यंदा तिनशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारायचे हे उद्दीष्ट्य पूर्ण करायचे असून केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने स्मारक उभारले जाणार असून त्याचा आराखडा तयार कराण्यात आल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.
श्री क्षेत्र नेवासा येथे ज्ञानेश्वर सृष्टीची उभारणी, गोदावरी कालव्याचे नूतनीकरण आणि निळवंडे कालव्याचे राहीलेले काम पूर्णत्वास नेणे हाच आपला पुढील काही दिवसांचा यांनी असेल असेही विखे पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी झालेल्या महीलांच्या अर्जाची पडताळणी कुठेही सुरू नसल्याचे स्पष्ट करून महायुतीने जाहीरनाम्यात या योजनेचे अनुदान २१०० रुपये करण्याची ग्वाही दिली त्याची पूर्तता निश्चीत होईल असे विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले.