◻️ शिवसेनेचे अमर कतारी व सहकार्याची निवेदनाद्वारे मागणी
संगमनेर LIVE | आज प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना संगमनेर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व शहरातील गरीब गरजू नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात अंत्योदय अन्न योजनाचा लाभ पात्र गरजूना देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लाभार्थी निवड करत असताना विधवा स्त्रिया, आजारी वा अपंग किंवा ६० वर्ष वयावरील वृद्ध, ज्यांना उदरनिर्वाहाचे निश्चित साधन नाही अथवा सामाजिक आधार नाही व त्याचप्रमाणे एक एकटे राहत असलेले दुर्धर आजार ग्रस्त अपंग, आदिवासी कुटुंबे, भूमीहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण पारंपरिक व्यवसाय करणारे कारागीर, झोपडपट्टीतील रहिवासी, रोजनदारीवर काम करून उपजीविका करणारे नागरिक, तसेच निराधार अशा नागरिकांना अंत्योदय अंतर्गत शिधापत्रिका देणे बंधनकारक आहे.
मात्र अनेक लाभार्थी या लाभापासून वंचित राहिलेले असुन अनेक गरजूना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे लाभार्थ्याना लवकरात लवकर लाभ मिळून द्यावा असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले.
दरम्यान याप्रसंगी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी, अमोल डुकरे, दीपक साळुंके, त्रीलोक कतारी, मनोहर जाधव, प्रशांत खजूरे, परदेशी, रोहन कतारी, सागर कतारी, भोला पवार, अनुप म्हाळस, लक्ष्मी खिची, साधना पवार, सुनिता मंडलिक, फुलमाळी, मसराम, तडासम आदि महिला व नागरिक उपस्थित होते.