◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार
संगमनेर LIVE | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल भाजपचे केंद्रीय गृहमंत्री यांनी काढलेल्या अवमान कारक वक्तव्याच्या निषेधार्थ संगमनेर मध्ये उद्या शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत भव्य निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संविधानावर भारतीय संसदेमध्ये चर्चा सुरू असताना केंद्रीय मग गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करून तमाम भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत.
अशा महामानवांबद्दल असे अनुद्गार काढणे अत्यंत दुर्दैवी आहे. तसेच परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ ही उद्या शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथे काँग्रेस, महाविकास आघाडी, इतर पुरोगामी आणि मित्र पक्षांच्या वतीने भव्य निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात आदी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान या निषेध आंदोलनाकरता सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, पुरोगामी विचारांच्या संघटना या सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.