अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात अहिल्यादेवी होळकर यांचे मोठे योगदान- सरुनाथ उंबरकर
◻️ उंबरी बाळापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवाभावी संस्थेचे भुमी पूजन
संगमनेर LIVE (आश्वी) | महाराष्ट्राचं नव्हे तर देशाच्या अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मोठे योगदान दिले आहे. राज्यकारभार सांभाळताना रयतेच्या भल्यासाठी केलेली कामे ही आजही दिशादर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने सुरू होणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचे काम होईल. असा विश्वास संगमनेर पंचायत समितीचे माजी विरोधीपक्षनेते सरुनाथ उंबरकर यांनी व्यक्त केला.
तसेच जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून संस्थेला निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही देखील उंबरकर यांनी यावेळी दिली.
संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापुर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र खेमनर आणि धोंडिबा खेमनर कुटुंबाच्या पुढाकारातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवाभावी संस्थेच्या कार्यालयाचे नुकतेच भुमीपुजन गावातील जेष्ठ नागरीकांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.