जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

संगमनेर Live
0
जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न 

◻️ डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन 

संगमनेर LIVE (नगर) | डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत जगभर पसरलेल्या एड्स या जिवघेण्या रोगा बद्दल जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी १ डिसेंबर हा एड्स दिन म्हणून पाळला जातो. जागतिक एड्स दिनाचा उद्देश एचआयव्ही किंवा एड्स टाळण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता पसरवणे, एड्स किंवा एचआयव्ही ग्रस्त लोकांशी भेदभाव थांबविणे आणि लोकांना शिक्षीत करणे हा आहे.

या कार्यक्रमासाठी डॉ. विखे पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे डॉ. डि. एम. धामणे व डॉ. सौ. शुभदा अवचट प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. तसेच महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. एम. बि. धोंडे यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. धामणे म्हणाले की, माझे आरोग्य, माझा हक्क या थिमच्या अनुषंगाने एड्स चा इतिहास सांगुन तो होण्याची कारणे, प्रतिबंध आणि समाजामध्ये एड्स रोगाबद्दल असणारे गैरसमज दुर करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थितांना डॉ. सौ. अवचट म्हणाल्या की, एड्स रोगाबद्दल चुकीचा प्रचार व प्रसार असुन, तसेच लैंगिक संबंधांबद्दल माहिती सविस्तर पणे सांगितली.

यावेळी महाविद्यालया मध्ये प्राचार्य डॉ. एम. बि. धोंडे यांनी एचआयव्ही एड्स पासून संक्रमणाचे मार्ग व प्रतिबंधात्मक उपाय तसेच व्यसनाधीन न राहाता सामाजिक बांधिलकेबाबत मार्गदर्शन केले.

दरम्यान या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. के. एस. दांगडे यांनी केले. आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. एस. बी. राऊत यांनी केले.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !