जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे निधन

संगमनेर Live
0
जेष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन

◻️ अकोले तालुक्याचे भाग्यविधाते काळाच्या पडद्याआड 

◻️ मागील दिड महिन्यापासून बेनस्ट्रोक मुळे होते आजारी

संगमनेर LIVE (अकोले) | महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदिवासी समाजाचे नेते, भाजपा नेते मधुकरराव पिचड यांचे वयाचे ८३ व्या वर्षी नाशिक येथे आज सायंकाळी ६. ३० वा निधन झाले आहे. गेले दिड महिन्यापासून ते बेनस्ट्रोक मुळे आजारी होते. त्यांच्या वर उद्या दिनांक ७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वा राजूर ता. अकोले येथे होईल.

राजूर येथील काशिनाथ पिचड या प्राथमिक शिक्षकाचे घरात त्यांचा जन्म झाला. पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालय त उच्च शिक्षण घेऊन मधुकराव पिचड हे तालुक्याच्या राजकारणात आले. मधुकरराव पिचड यांची १९७२ ला अकोले जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झाली. १९७२ ते १९८० या काळात ते पंचायत समितीचे सभापती होते. १९८० ते २००९ असे सलग ७ वेळा आमदार झाले.

विविध खात्यांची जबाबदारी पाडली..

मधुकरराव  पिचड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास, पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली होती. १९९५ ते १९९९ या काळात त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद सांभाळले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य तसेच प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही पिचड यांनी धुरा सांभाळली होती

मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिला. 

मधुकराव पिचड यांनी १९७६ मध्ये अमृत सागर दूध सहकारी संघाची स्थापना केली. तर, १९९३ मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन केला.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून १९८० च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर १९८५ व १९९० च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते.

२५ जून १९९१ रोजी आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री झाले आणि सुधाकरराव नाईक मंत्रालयात ३ नोव्हेंबर १९९२ पर्यंत काम केले.

६ मार्च १९९३ रोजी आदिवासी विकास मंत्रालय, दुग्धविकास मंत्रालय , प्रवास विकास मंत्रालय आणि पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयासाठी कॅबिनेट मंत्री म्हणून १४ मार्च १९९५ पर्यंत काम केले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून १९९५ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सलग चौथ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि २००० पर्यंत काम केले.

२७ ऑक्टोबर १९९९ रोजी तिसऱ्यांदा आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री झाले.

१९९९ व २००४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून सलग पाचव्यांदा व सहाव्यादा अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.

२००९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून सलग सातव्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते.

११ जून २०१३ रोजी आदिवासी विकास मंत्रालय, आदिवासी विकास मंत्रालय, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण मंत्रालयासाठी कॅबिनेट मंत्री झाले.

आदिवासी कुटुंबात जन्म..

मधुकरराव पिचड यांचा जन्म १ जून १९४१ रोजी महादेव कोळी या आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील काशिनाथ पिचड हे एक शिक्षक होते. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी बीए. एलएलबी असे वकिलीचे शिक्षण पूर्ण केलं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !