सर्व निवडणुका इव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या - सौ. प्रभावती घोगरे
◻️ सौ. प्रभावती घोगरेकडून मताच्या वाढलेल्या टक्केवारीवर प्रश्न उपस्थित
◻️ शिर्डी विधानसभा मतसंघात कॉग्रेसकडून स्वाक्षरी मोहीमेला सुरुवात
संगमनेर LIVE (राहाता) | सर्वसामान्य मतदार, जनता, राजकीय पक्ष, नेते, राजकीय विश्लेषक यांचा इव्हीएम वर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे येथून पुढे सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात असा समाजातून आवाज उठत आहे. सर्वसामान्य जनतेचा लोकशाहीवरील विश्वास टिकून राहावा यासाठी शिर्डी मतदार संघात काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या बाबतीत स्वाक्षरी मोहीम राबवून लाखोंच्या संख्येने स्वाक्षरीचे निवेदन देणार असल्याची माहिती कॉग्रेसच्या सौ. प्रभावती घोगरे यांनी दिली.
निवडणुका मतपत्रिका (बॅलेट) पेपरवर घेण्यात याव्यात या मागणीसाठी राहाता काँग्रेस कमिटीच्यावतीने स्वाक्षरी मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष अँड. पंकज लोंढे, गणेश कारखान्याचे संचालक भगवानराव टिळेकर, बाबासाहेब डांगे, उत्तमराव मते, नितीन सदाफळ, संजय जेजुरकर, सदाशिव गाडेकर, गणेश सोमवंशी, नानासाहेब नळे, बाळासाहेब चोळके, संपत हिंगे, सिमोन जगताप, अमोल आरणे, संजय पगारे, संजय डांगे, रमेश गागरे, राजेंद्र आग्रे, संदीप कोकाटे, राजेंद्र निर्मळ, अमोल घोगरे, जाकीर शेख, मुन्ना फिटर, प्रशांत घोगरे, अनिस शेख, समद शेख, प्रफुल्ल धिवर, उत्तमराव अरंगळे, भाऊसाहेब नळे, विजय जगताप, विष्णू डांगे, भानुदास कातोरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
सौ. घोगरे पुढे म्हणाल्या की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. मल्लीकार्जुन खरगे यांनी इव्हीएम मशीन हटवून मतपत्रिका (बॅलेट) पेपरवर मतदान घ्या, अशी मागणी केंद्रिय निवडणूक आयोगाकडे केली आहे. या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकार आहे.
निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतांच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले. त्याच रात्री ११.३० वा ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
तब्बल ७६ लाख मतांची हि वाढ असून मतांचा टक्का कसा वाढला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे इव्हीएम संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे येथून पुढे सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.