◻️ जिल्हाधिकाऱ्यानी सरपंच पदासह सदस्य पद ही केले रद्द
◻️ न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास ; हार मानणार नाही - प्रमोद बोंद्रे
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील शिबलापूर गावचे सरपंच प्रमोद बोंद्रे यांचे जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी सरपंच पद आणि सदस्य पद देखील रद्द केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्रमोद बोंद्रे हे कॉग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांने समर्थ असल्यामुळे माजी मंत्री थोरात यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
याबाबत दिपक रक्टे यांच्या तक्रारीवरुन मिळालेल्या माहितीनुसार, शिबलापूर ग्रामपंचायतीच्या संरपच पदाच्या निवडणुकीत प्रमोद बोंद्रे हे निवडुन आले होते. त्यानंतर प्रमोद बोंद्रे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला असल्याचा गंभीर आरोप करत त्यांचे सदस्यत्व अपात्र करावे असा अर्ज महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम प्रमाणे विवाद जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आला होता.
त्यामुळे सरपंच प्रमोद बोंद्रे यांना लेखी म्हणणे मांडण्यास सांगितले असता त्यांनी ग्रामपंचायतीने कायदेशीर प्रक्रिया पार पाडली असल्याची माहिती दिली.
तर, याबाबतचा अहवाल संगमनेर पचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी दिला होता. त्या अहवालानुसार दोघांचे ही लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आले होते.
तक्रारदारांनी युक्तीवादा दरम्यान प्रमोद बोंद्रे यांचे सदस्यपद रद्द करावे अशी मागणी केली होती.
त्यानुसार ग्रामपंचायत अधिनियम व तरतूदीनुसार प्रमोद बोंद्रे यांचे सरपंच पदासह सदस्य पद देखील अपात्र ठरवण्यात आले आहे. असे आदेश जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी काढल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान तक्रारदारांच्या बाजूने ॲड. स्वप्नील काकड यांनी काम पाहिले. तर बोंद्रे यांना या निकालाबाबत पुढील १५ दिवसांच्या आत नाशिक येथील विभागीय आयुक्तांकडे अपिल करता येणार आहे.
न्याय व्यवस्थेवर आमचा पुर्ण विश्वास असुन विभागीय आयुक्तांकडे मी दाद मागणार आहे. तसेच हार न मानता न्यायालयीन लढा आपण शेवटपर्यत लढणार असल्याची प्रतिक्रिया प्रमोद बोंद्रे यांनी दिली आहे.