राहुरी पोलीस व शिक्षण विभागाच्या प्रबोधनाची जिल्ह्यात चर्चा

संगमनेर Live
0
राहुरी पोलीस व शिक्षण विभागाच्या प्रबोधनाची जिल्ह्यात चर्चा 

◻️ पतंग उडवताना नायलॉन मांजा विक्री अथवा वापर न करण्याचे आवाहन
 

◻️ १० हजार विद्यार्थ्यानी नायलॉन मांजा न वापरण्याची घेतली शपथ

◻️ कारवाई करिता चार पथके तैनात

संगमनेर LIVE | राहुरी पोलीस स्टेशनने संक्रांतीनिमित्त उडवण्याबाबत घ्यावयाची खबरदारी याबाबत चार शाळांमधील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना समक्ष भेटून प्रबोधन केले. 

तसेच तालुक्यातील शाळा प्रशासनाला गटविकास अधिकारी मुंडे व गटशिक्षणाधिकारी तुंबारे यांच्यामार्फत आवाहन करून  विद्यार्थ्यांना पतंग उडवताना घ्यावयाची खबरदारी व नायलॉन मांजा न वापरण्याबाबत शपथ घेण्याबाबत आव्हान केले. तालुक्यातील सुमारे ३५० शाळांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला व सुमारे १० हजार विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजा न वापरण्याची व सुरक्षित पतंग उडवण्याची शपथ घेतली

शपथ..

“आम्ही पतंग उडवताना आमच्या व इतर नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेवु. आम्ही पतंग उडवल्यास आमचा तसेच इतर कुणाचा ही अपघात होणार नाही याची खबरदारी घेवु. तसेच पतंग उडवताना आम्ही नायलॉन मांजा वापरणार नाही, इतरानाही वापरू देणार नाही. तसेच कुणी नायलॉन मांजा वापरत असल्यास / विक्री करत असल्यास त्याची माहिती वडीलधाऱ्या मंडळींना, गावातील पोलीस पाटील यांना, पोलिसांना तसेच वर्ग शिक्षक यांना माहिती देवू.”

अशा प्रकारे राहुरी पोलीस व शिक्षण विभाग यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने नायलॉन मांजा न वापरण्याबाबत प्रबोधन केले.

तसेच गटविकास अधिकारी यांच्या मार्फत सर्व ग्रामपंचायत कार्यालयांना दवंडी देऊन मांजाचा वापर न करता सुरक्षितपणे पतंग उडवावे असे आव्हान केले. 

यासाठी विशेष प्रयत्न पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलवरमे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार सहायक फौजदार अंबादास गीते पोलिस हवालदार, अशोक शिंदे, संदीप ठाणगे, शकूर सय्यद, आजिनाथ पाखरे, नदीम शेख प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे यांच्या पथकाने गटविकास अधिकारी मुंडे व गटशिक्षणाधिकारी तुंबारे यांच्या  व सर्व पोलीस पाटील यांच्या समन्वयातून केली.

दरम्यान राहुरी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये कुणी मांजा विक्री करत असल्यास संपर्क साधा 9552105100 ; 8788891147 या नबंरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !