शरद पवाराचे दगाफटक्याचं राजकारण जमिनीत गाडण्याचं काम जनतेने केले
◻️ केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची शिर्डी येथे आयोजित अधिवेशनात घणाघाती टिका
संगमनेर LIVE (शिर्डी) | शरद पवारांनी १९७८ पासून दगाफटक्याचं राजकारण सुरू केले. उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये विचारधारा सोडून खोटं बोलून मुख्यमंत्री पद मिळवलं. भाजप सरकार शेतकऱ्यांना मदत करून त्यांच्या समस्या सोडवण्याच्या काम करणार आहे. शरद पवाराचे दगाफटक्याचं राजकारण जमिनीमध्ये गाडण्याचं काम जनतेने केल्याची घणाघाती टिका केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
शिर्डी येथे आयोजित भाजपच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात मार्गदर्शन करताना केंद्रिय गृहमंत्री अमित शाह बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, पीयूषजी गोयल, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मंत्री आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आणि भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, जेष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा, गणेश नाईक, जयकुमार गोरे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, प्रकाश जावडेकर, खासदार नारायण राणे, खासदार अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि भाजपचे राज्यभरातील सर्व नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
अमित शहा पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना जनतेने जागा दाखवून दिली आहे. ‘भारत माता की जय’ ही घोषणा देताना स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी विजयी होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. १९७८ पासून २०२४ पर्यत अस्थिर राजकारण संपवत स्थिर फडणवीस सरकार देण्याचं काम केलं आहे. लोकसभेनंतर महाराष्ट्रातही विजय होईल विरोधकांच्या या स्वप्नाला धुळीस मिळवलं आहे. अनेक निवडणुका अशा असतात की देशाचं राजकारण बदलतात. माझे शब्द लक्षात ठेवा २५ वर्षांनी इतिहास साक्षी असेल महाराष्ट्रातील महाविजयाने देशाच्या राजकारणाची गाडी पुन्हा रूळावर आणण्याचं काम केलं आहे.
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांचे विशेष आभार. विजय महायुतीने विजय मिळवल्याचं सांगत अमित शहांनी शरद पवारांवर निशाणा साधला. शरद पवार इतकी वर्षे शेतकऱ्यांचे नेते राहिले, मुख्यमंंत्री होऊन गेले पण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकले नाहीत. भाजप सरकार प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवल्याशिवाय राहणार नाही असंही शहा म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, विधानसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांनी व्होट जिहाद करण्याचा प्रयत्न केला. तसेच अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला असा विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच मुख्यमंत्र्यांनी युतीच्या ऐतिहासिक विजयासाठी भाजप कार्यकर्त्याचे विशेष आभार मानले. साईबाबांनी दिलेला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र भाजपसाठी महत्वाचा असल्याचे अधोरेखित करताना राष्ट्रप्रथम म्हणजे श्रद्धा आहे आणि अंती असणारा मै हा सबुरी असल्याचे म्हटले.
यावेळी केंद्रिय मंत्री अमित शाह यांचा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार शिवाजी कर्डीले, मोनिका राजळे, विक्रम पाचपुते, स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड यांनी सत्कार केला.
या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी आमदार विक्रांत पाटील, माधवी नाईक, राजेश पांडे, संजय केणेकर, विजय चौधरी, रवीजी अनासपुरे यांनी तर स्थानिक पातळीवर माजी खासदार सुजय विखे पाटील, जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, अभय आगरकर, राजेंद्र गोंदकर, सीताराम भांगरे, नितीन कापसे, किरण बोराडे, योगीराज परदेशीं, रवींद्र गोंदकर, भाऊसाहेब वाकचौरे, अशोक पवार, योगेश गोंदकर, कांचनताई मांढरे, जगन्नाथ गोंदकर यांच्या सह अनेक कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.
दरम्यान भाजपाच्या या भव्य अधिवेशनात प्रवरा पॅटर्न आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या नियोजनाची चर्चा सर्वत्र सुरू होती.