वर्तमानपत्र आज ही शाश्वत पुरवा म्हणुन ग्राह्य धरले जाते - प्राचार्य देविदास दाभाडे
◻️ आश्वी महाविद्यालयांकडून राष्ट्रीय सेवा योजनेच्या सांगता शिबीरात पत्रकारांचा सन्मान
संगमनेर LIVE (आश्वी) | आज ही वर्तमानपत्राकडे शाश्वत पुरवा म्हणून पाहिले जाते. त्यामुळे वर्तमानपत्राचे महत्व किती आहे हे आपल्या लक्षात येईल. पत्रकारीतेच्या माध्यमातुन आश्वी परिसरातील पत्रकार हे ग्रामीण भागातील समस्या निर्भिडपणे शासन दरबारी मांडतात आणि त्या समस्येचे निराकरण होत नाही, तोपर्यत त्यांचा पाठ पुराव देखील करतात. अशा शब्दांत प्राचार्य देवीदास दाभाडे यांनी पत्रकाराचा गौरव केला.
संगमनेर तालुक्यातील पिप्रीं - लौकी अजमपुर येथे आश्वी खुर्द येथील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्र महाविद्यालयात आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबीरच्या सांगताप्रसंगी पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकाराचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य देवीदास दाभाडे बोलत होते.
यावेळी प्रवरेचे जेष्ठ संचालक अण्णासाहेब भोसले, जेष्ठ कार्यकर्ते प्रा. कान्हु गिते, सरपंच संगिता गिते, उपसरपंच बाजीराव गिते, भारत गिते यांच्यासह प्रा. अमित शिंदे, प्रा. गणेश खेमनर, प्रा. गौरी क्षिरसागर, प्रा. खेमनर, प्रा. गणेश शेळके, प्रा. पर्वत, गोरक्षनाथ गिते, कैलास गिते, बाळासाहेब गिते, तान्हाजी गिते, मगन गिते, विठ्ठल दातीर, विजय कदम आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य दाभाडे म्हणाले की, पत्रकारीता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकार हा समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे. सत्ताधाऱ्यांवर अंकूश ठेवण्यासाठी आणि विरोधाकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी पत्रकारांनी निःपक्षपातीपणे स्पष्ट आणि समाजहिताला पोषक होईल अशी मांडणी करणे गरजेचे आहे. तरचं शासनकर्त्यावर लोकाचा वचक राहु शकतो. असे मत मांडले.
दरम्यान यावेळी पत्रकार वैभव ताजणे, रविंद्र बालोटे, संजय गायकवाड, योगेश रातडीया, राजेश गायकवाड आणि अनिल शेळके यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.