◻️ पत्रकारांना समाजसेवेचे व्रत कायम ठेवण्याचे आवाहन
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडीया शाखेत ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.
यावेळी स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या आश्वी बुद्रुक शाखेत पत्रकारदिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच बबनराव शिंदे होते. पोलीस निरीक्षक संजय सोनवणे, स्टेट बँक ऑफ इंडीया शाखेचे शाखाधिकारी परीमल पवार, सेन्ट्रल बॅक ऑफ इंडीयाच्या शाखाधिकारी मनिषा नवले, राहुल पाबळकर, माधुरी तळवले यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी दै. लोकसत्ताचे जेष्ठ पत्रकार सीताराम चांडे, दै. लोकमतचे योगेश रातडीया, दै. पुण्यनगरीचे संजय गायकवाड, दै. सार्वमतचे रविंद्र बालोटे, संगमनेर लाईव्हचे अनिल शेळके, दै. नवराष्ट्रचे वैभव ताजणे, प्रेस फोटोग्राफर भाऊसाहेब ताजणे, जेष्ठ पत्रकार रामनाथ जऱ्हाड, दै. कॉमन न्युजचे सचिन उपाध्ये तसेच अझर शेख यांचा सन्मान करण्यात आला.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा ठेवा, कार्याची पद्धत यामाध्यमातून समाजात प्रबोधन घडवून आणण्यात मोलाचा वाटा असल्याचे शाखाधिकारी परीमल पवार यांनी सांगितेल. तसेच पत्रकारांनी समाजसेवेचे व्रत कायम ठेवावे असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील घोडेकर यांनी केले. आभार आश्वी प्रेस क्लबचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार सीताराम चांडे यांनी मानले. हा सुंदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुषार भडकवाड, वैभव रक्टे यांनी विशेष परीश्रम घेतले.