पत्रकार भवनासाठी दहा लाख रुपये निधी देणार - आमदार अमोल खताळ
◻️ संगमनेर येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित संवाद मेळाव्यात आमदार खताळ यांची ग्वाही
संगमनेर LIVE | आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या ६ जानेवारी जयंती आणि पत्रकार दिनानिमित्त सोमवारी संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांनी ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांच्या संवाद व स्नेहभेट मेळाव्याचे आयोजन केले होते.
यावेळी आमदार अमोल खताळ यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यानंतर पत्रकार संवाद मेळाव्याला सुरुवात करण्यात आली.
यावेळी ग्रामीण व शहरी भागातील पत्रकाराची अनेक वर्षापासून मागणी असलेले पत्रकार भवन बांधण्यासाठी जागा उपलब्ध झाल्यानंतर दहा लाख रुपये निधी देण्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी उपस्थित पत्रकार यांना दिली. तसेच याप्रसंगी पत्रकारांशी झालेल्या संवादादरम्यान पुढे आलेल्या सर्व सूचनांचे पालन केले जाईल असे आमदार खताळ सांगितले.
दरम्यान याप्रसंगी उपस्थित पत्रकाराचा सन्मान करण्यात आला आहे.