जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर

संगमनेर Live
0
जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर

◻️ ३७० बक्षिसे, २९ प्रशंसापत्र आणि सलग १६ वर्षे A+ शेरा

◻️ अहिल्यानगर जिल्ह्यातील सराईत गुंडांच्या टोळ्या, दरोडेखोर आदि गुन्हेगाराचा केला होता बंदोबस्त 

संगमनेर LIVE | पोलीस सेवेत उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्वक कामगिरी करणाऱ्या पोलिसांना केंद्रीय गृह विभागाकडून प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील एकूण ४३ पोलीस या पदकांचे मानकरी ठरले असून त्यात चौघांना विशिष्ट सेवा पदकं, तर ३९ जणांना गुणवत्तापूर्ण सेवा पदकं घोषित झाली आहेत. 

यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देवमान वाघ यांनी ३४ वर्षे पोलीस दलात राहुन विशेष आणि उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल त्यानां गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक घोषित करण्यात आले आहे.

पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देवमान वाघ यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील आण्णा लष्करे, पाप्या शेख अशा सराईत गुंडांच्या टोळ्या पकडणे. परराज्यातील गावठी पिस्तुल (कट्टे) तयार करणारे १८८ गुन्हेगारांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन १०१ देशी बनावटीचे पिस्तुल (कट्टे) व २६३ जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. 

जिल्ह्यात गाजलेले पेट्रोलपंपावरील दरोडे व जिल्ह्यातील इतर १५४ दरोडेखोरांना अटक करुन त्यांचेकडुन ७४,८१,००० रुपये किंमतीचा चोरीस गेलेला माल जप्त केला आहे. रात्री व दिवसा अशा ३६ घरफोडी गुन्ह्यातील १५६ गुन्हेगारांना अटक करुन त्यांचेकडुन दिडकोट रुपये किंमतीचा चोरीस गेलेला माल जप्त केला आहे.

त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील ७४ अट्टल फरार गुन्हेगारांना अटक केली होती. जिल्ह्यात बनावट चलनी नोटा खऱ्या असल्याचे भासवुण चलणात आणणारे २ आरोपींना ६० हजार रुपये किंमतीच्या बनावट चलनी नोटांसह ताब्यात घेतले आहे.

खडकवाडी (ता. पाथर्डी) येथे ११ वर्षापुर्वी घडलेला ना उघड खुनाच्या गुन्ह्याची उकल करुन आरोपीचा शोध घेवुन अटक केली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोटार सायकल चोरी करणारे २० सराईत गुन्हेगारांचा शोध घेवुन त्यांचेकडुन १२० चोरीच्या मोटार सायकल हस्तगत केल्या होत्या.

महाराष्ट्र राज्यात गाजलेला खटला - शाळकरी मुलगी नामे अंबिका डुकरे व जयश्री डांगे यांचा बलात्कार करुन खुन करणारा नेवासा येथील नराधम आरोपी अनिल पवार यास अटक करुन दुहेरी फाशीचे शिक्षेपर्यंत पोहचविले. जिल्ह्यातील बहुचर्चीत कांडेकर खुन खटल्यातील ३ शार्प शुटरचा गोवा राज्य व पुणे जिल्हा येथुन अटक व या आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

अहिल्यानगर शहरात सन २००४ साली शिवजयंती साजरी होतांना मिरवणुक मार्गावर घातपाताचे तयारीतील १५ आरोपींचे कब्जातुन ३५ लि. अँसिडच, १३ चॉपर, ४३ लाकडी दांडके, २ तलवारी, २०० रिकाम्या बाटल्या अशी हत्यारे वेळीच ताब्यात घेतल्याने मोठी घातपाताची घटना टाळली.

शिर्डी येथील प्रतिष्ठीत कुटूंबातील २ मुलांचे अपहरण करुन खुन करणारा आरोपी पाप्या सलीम ख्वाजा शेख आणि त्यांचे इतर ११ साथीदारांची गुप्तबातमीदारांकडुन माहिती घेवुन अटक केली व सर्व १२ आरोपी विरुध्द मोक्का अन्वये गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्यात न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

भरोसा सेल येथे कामकाज करत असतांना १२५ कौटुंबिक प्रकरणांमध्ये समुपदेशकाची महत्वपुर्ण भुमिका बजावुन त्यांचे संसार पुर्न:स्थापित करण्यात मोलाचा वाटा उचलला व अहिल्यानगर शहरातील शाळा कॉलेज परिसरात १,१४८ मुलींची छेडछाड करणारे तरुण टोळक्यांचे समुपदेशन करुन त्यांना अशा गोष्टीपासुन परावृत्त केले.

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांनी पोसई राजेंद्र वाघ यांना ३७० बक्षिसे व १,६४,८०० रुपये रोख रक्कम व २९ प्रशंसापत्र तसेच सलगपणे १६ वर्षे A+ शेरा दिलेला आहे. सन २०१६ मध्ये त्यांना पोलीस महासंचालक पदक देवुन सन्मानित करण्यात आले आहे. तर स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथे नेमणुकीस असताना चांगली कामगिरी बजावली होती.

दरम्यान पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देवमन वाघ यांना भारतीय गणराज्य दिनानिमित्ताने राष्ट्रपती पोलीस पदक जाहिर झाल्याने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुभर्मे, पोलीस उपअधीक्षक (ठाणे) अशोक राजपुत, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हेचे दिनेश आहेर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !