आश्वी येथील इंग्लिश स्कूल शाळेच्या १९९० बॅचच्या विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा संपन्न
◻️ ३५ वर्षानंतर विद्यार्थी एकत्र आल्यामुळे झाले भावुक
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील इंग्लिश स्कूल आश्वी शाळेच्या १९९० बॅचचे विद्यार्थी व विद्यार्थीनी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने ३५ वर्षानंतर नुकतेच एकत्र आले होते.
रयत शिक्षण संस्थेच्या इंग्लिश स्कूल आश्वी बुद्रुक शाळेतील १९९० सालातील इयत्ता दहावीच्या बॅचचे विद्यार्थी व विद्यार्थीनी स्नेह मेळावा सावळेविहीर येथील निसर्गरम्य ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यानी जुन्या आठवणींना उजाळा देत ऐकमेकांशी दिलखुलास संवाद साधला. ३५ वर्षाच्या कालखंडानंतर एकमेकांना भेटत असल्यामुळे चेहरा व राहणीमानात आमुलाग्र बदल झाल्यामुळे एकमेकांना ओळखने ही कठीण झाले होते. हे सर्व माजी विद्यार्थी नोकरी व व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या शहरात वास्तव्यास आहेत. विद्यार्थिनी देखील विवाहामुळे सासरी गेल्या होत्या. मात्र रवींद्र तापडिया, मंगेश चोपडा, डाॅ. वैभवी देवळालकर, वैशाली जऱ्हाड - पडळकर, योगेश रातडीया यांनी या स्नेह मेळाव्यानिमित्त सर्वाना एकत्र आणले होते.
या मेळाव्यात दरम्यान आपले सहकारी मित्र सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शिक्षण, पत्रकारीता, उद्योजक, प्रशासकिय आधिकारी, प्रगतशील शेतकरी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्याचे समजल्यानंतर सर्वाचे उर भरुन आले.
यावेळी माजी विद्यार्थी तथा संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य सरुनाथ उंबरकर, प्रतापपूरचे माजी सरपंच लक्ष्मण आंधळे, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राध्यापक शैलेंद्र बालोटे, आदर्श शिक्षक विठ्ठलराव काकडे, पत्रकार योगेश रातडीया, मंगेश चंगेडीया, अँड. सुदाम डोळेझाके, प्रतिक्षा ताजणे - डाके, डाॅ. वैभवी देवळालकर - देव, मंदाकिनी हळनोर - वडितके, जहारा शेख, वैशाली जऱ्हाड - पडळकर, रंजना डोंगरे - डूकरे, मंगल थोरात - डोइफोडे, संगीता जऱ्हाड - चांडे, सुनिता बर्फे - नलावडे यांच्यासह मोठ्या संख्येत माजी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उपस्थित होते.
दरम्यान भविष्यात सर्वानी एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे आश्वासन दिले आहे.