पिंप्री - लौकी अजमपुर येथे प्रवरचे बाह्या रुग्णालय होणार - प्रा. कान्हु गिते
◻️ डॉ. राजेद्र विखे पाटील यांच्याकडून ग्रामस्थाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद
संगमनेर LIVE (आश्वी) | पिंप्री - लौकी अजमपुर गावाभोवती लहान - मोठ्या वाड्या वस्त्याची संख्या मोठी आहे. त्यामुळे दवाखाण्यासाठी या गावाना लोणी अथवा संगमनेर येथील दवाखान्यावर आवलंबुन राहावे लागत असते. त्यामुळे लवकरच लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालय संचालित बाह्या रुग्णालय येथे सुरू होणार असल्यामुळे परिसरातील गोर - गरीब नागरीकाची मोठी सोय होणार असल्याची माहिती जेष्ठ कार्यकर्ते प्रा. कान्हु गिते यांनी दिली.
प्रवरा ग्रामीण रूग्णालयाचे विश्वस्त डॉ. राजेद्र विखे पाटील यांची नुकतीचं संगमनेर तालुक्यातील पिंप्री - लौकी अजमपुरच्या ग्रामस्थानी भेट घेत गावात बाह्या रुग्णालय सुरू करावे अशी विनंती केली होती. या मागणीला डॉ. राजेद्र विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच आद्यावत बाह्या रुग्णालय सुरू करण्याची ग्वाही ग्रामस्थांनी दिली आहे.
दरम्यान याप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते प्रा. कान्हु गिते, भाऊसाहेब लांवरे, अनुप कदम अशोक गिते, भास्कर गिते, रामदास दातीर, दादाहरी गिते, सुर्यभान गिते, भारत गिते, संजय बिडवे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.