अजिंक्य राहणेच्या हस्ते उद्या सहकारमहर्षी चषक पुरस्काराचे वितरण

संगमनेर Live
0
अजिंक्य राहणेच्या हस्ते उद्या सहकारमहर्षी चषक पुरस्काराचे वितरण

◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे उपस्थित राहणार

◻️ स्पर्धेच्या रौप्य महोत्सवी वर्षात ३२ संघांचा सहभाग

संगमनेर LIVE | राज्यभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या सहकारमहर्षी टी - २० क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण व अंतिम सामन्यासाठी शुक्रवार दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता भारताचा माजी कसोटी कर्णधार तथा संगमनेर तालुक्याचा सुपुत्र अजिंक्य रहाणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे ही उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक आमदार सत्यजित तांबे यांनी दिली.

जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे १ जानेवारीपासून राज्यस्तरीय टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे हे २५ वे वर्ष असून यामध्ये ३२ संघांचा सहभाग घेतला आहे. या वर्षी या स्पर्धेत रणजी व आयपीएल मधील काही खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.

१७ दिवस चाललेल्या या स्पर्धेत षटकारा चौकारांच्या आतिषबाजीने स्टेडियम दणाणून गेले. राष्ट्रीय दर्जाचे आयोजन, खेळाडूंना रंगबिरंगी कपडे, संपूर्ण मैदानावर हिरवळ, प्रेक्षकांसाठी चांगली बैठकव्यवस्था, पार्किंग , ऑनलाईन प्रक्षेपण यांचा सर्व आधुनिक सुविधा यामुळे या स्पर्धेला दररोज दहा हजार प्रेक्षकांची उपस्थिती लाभत आहे.

उद्या शुक्रवार दि. १७ जानेवारी रोजी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा वाढदिवसही स्टेडियम मध्ये होणार असून या २५ व्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण व अंतिम सामना होणार आहे. यावेळी भारताचा माजी कसोटी कर्णधार तथा संगमनेर तालुक्याचा सुपुत्र अजिंक्य रहाणे पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !