प्रतापपुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. विमल सांगळे यांची निवड
◻️ जेष्ठ नेते भगवानराव इलग यांच्या हस्ते नुतन पदाधिकारी यांचा सत्कार
संगमनेर LIVE | शिर्डी विधानसभा मतदारसंघासह संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्रतापपुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. विमल भास्कर सांगळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे कुलपती राजेंद्र विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापपुर ग्रामपंचायत विविध विकास कामात अग्रेसर आहे.
त्यामुळे जेष्ठ नेते भगवानराव इलग यांच्या नेतृत्वाखाली ठरल्याप्रमाणे प्रतापपुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. विमल भास्कर सांगळे यांची सर्वानुमते नुकतीच निवड करण्यात आली. यावेळी नुतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ व्यक्तीमत्व दगडू आप्पा आंधळे होते.
दरम्यान नुतन उपसरपंच यांचे जेष्ठ नेते भगवानराव इलग, सरपंच पांडुरंग आंधळे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळकृष्ण सांगळे, चेअरमन गजानन आव्हाड, व्हा. चेअरमन सखाराम आंधळे, ट्रक वाहतूक सोसायटीचे संचालक शिवाजीराव इलग, सुखदेव आंधळे, लक्ष्मण आंधळे, अजय आंधळे, सुनिल सांगळे, बबन घुगे, कचेश्वर आंधळे, दत्तात्रय आंधळे, सोमनाथ गिते, दिलीप आंधळे, भिकाजी सांगळे, शंकर खामकर,
ज्ञानेश्वर आंधळे, जितेंद्र इलग, दादा इलग, संजय आंधळे, रवींद्र सांगळे, सतिश आव्हाड, भाऊसाहेब आंधळे, हर्षल इलग, सौ. संगिता आव्हाड, सौ. सिंधुताई इलग, सौ. अनिता आंधळे, सौ. हिराबाई इलग, सौ शोभा आंधळे, सौ. मंदाताई घुगे, सौ. कविता सांगळे, सौ. आशा सांगळे, सौ. इंदुबाई सांगळे, सौ. मीना सांगळे, सौ. भीमाबाई आंधळे, सौ. अलका इलग, सौ. पूजा सांगळे, गणेश आंधळे, संदीप नागरे, ग्रामसेवक राशीनकर आदिसह ग्रामस्थानी अभिनंदन केले आहे.