प्रथमेश झंवरची अंडर - १९ महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

संगमनेर Live
0


प्रथमेश झंवरची अंडर - १९ महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

◻️ अनेक युवकांनी क्रीडा क्षेत्रातून संगमनेरचे नाव पुढे नेले - मा. मंत्री थोरात

संगमनेर LIVE | अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रामध्ये ही तरुणांना करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. संगमनेर मधील अनेक युवकांनी वेगवेगळ्या खेळांमधून तालुक्याचे नाव राज्य व राष्ट्रीय पातळीवर नेले असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे प्रथमेश अमर झंवर याचा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, बाबा ओहोळ, रणजितसिंह देशमुख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजीमंत्री थोरात म्हणाले की, संगमनेर मध्ये चांगल्या शिक्षणाबरोबर करिअरच्या विविध संधी युवकांसाठी निर्माण झाले आहेत. यामध्ये खेळामधूनही अनेक युवकांनी आपले करिअर निर्माण केले आहे. अजिंक्य रहाणे ने संगमनेरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटमधून नेले. देशाच्या कसोटी क्रिकेटचे नेतृत्वही त्याने केले. हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण ठरला. याचबरोबर पूनम राऊत माया सोनवणे या मुली आयपीएल मध्ये खेळत आहे. तर नव्याने सुद्धा अंडर १५ आणि अंडर १९ मध्ये अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. प्रथमेश झंवर याने आपल्या खेळाकडे अधिक लक्ष देऊन अजिंक्य रहाणे नंतर संगमनेरचे नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यावे अशा शुभेच्छा दिल्या.

डॉ. तांबे म्हणाले की, पालकांनी मुलांना मैदानी खेळांकडे वळवली पाहिजे हल्ली सर्व मुले मोबाईल मध्ये अडकलेली असतात. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातील करियर त्यांच्यासाठी अवघड ठरते चांगले आरोग्यासाठी मैदानी खेळ हे गरजेचे असून यामधूनही अनेकांना मोठे भवितव्य करता येते. यासाठी प्रथमेश अजिंक्य यांची उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर असल्याचे ते म्हणाले.

यावेळी अमृतवाहिनी संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अनिल शिंदे, प्रथमेशचे आई - वडील व नातेवाईक यांच्यासह अमृतवाहिनी मधील शिक्षक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !