◻️ शिबलापूर येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर संपन्न
संगमनेर LIVE | सध्याचा विद्यार्थी हा भविष्याचा नागरिक असून, त्याला श्रमसंस्कार आणि दिशा देण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांच्या माध्यमातून केले जाते असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत व स. ब. वि. प्र. समाज संस्थेच्या सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विशेष श्रमसंस्कार शिबिर २०२४-२०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा गुरुवार दि. १६ जानेवारी रोजी सकाळी संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे समारोप झाला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ यांनी केले. शिबिर काळात केलेल्या कामाचे अहवाल वाचन एनएसएस शिबिराचे कार्यक्रम आधिकारी प्रा. डॉ. राजेश मंजूळ यांनी केले. यावेळी डॉ. संजय सांगळे, दत्तात्रय चासकर, रजिस्ट्रार बाबुराव गवांदे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. गोरक्ष हासे यांनी आभार मानले व प्रा नानासाहेब दिघे यांनी सूत्रसंचलन केले.
याप्रसंगी बापूसाहेब पाबळ, रावसाहेब नागरे, चेतन म्हस्के, भाऊसाहेब नागरे, बाळासाहेब मन्तोडे, महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. विलास कोल्हे, नॅक समन्वयक डॉ. लक्ष्मण घायवट, कार्यालयीन अधीक्षक गोरक्ष पानसरे, डॉ. त्रिंबक राजदेव, डॉ. पी. एम. गायकवाड, प्राचार्य शेख प्रो. डॉ. बैरागी, प्रा. गणेश थोरात, डॉ. जोरवर, डॉ. खैरे, प्रो. डॉ. बोऱ्हाडे, डॉ. कदम, प्रा. नानासाहेब गुंजाळ, प्रा. महेश हजारे, प्रा. महाले, प्रा. स्नेहलता थिटमे, प्रा. वैशाली शिंदे, प्रा. साबळे, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, ग्रामस्थ उपस्थित होते.