परिश्रम, जिद्द आणि चिकाटी बाळगल्यास ध्येय साध्य होईल - बाळासाहेब कोळेकर
◻️ मांचीहिल येथे आयोजित दोन दिवसीय सांस्कृतिक कला महोत्सवांची उत्साहात सांगता
◻️ विभागीय आयुक्त नयना गुंडे आणि अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी भारावले
संगमनेर LIVE | आपल्या कामात पुर्णपणे रममान झाल्याशिवाय यश मिळत नाही. तुम्हाला तुमची स्वप्नं साकार करायची असल्यास स्वता:मध्ये आधी जिद्द निर्माण करावी लागेल. कारण एखादी गोष्ट तुमच्या मनाने स्वीकारली तरचं ती पुर्णत्वास जात असते. त्यामुळे स्वतः आधी एखादे ध्येय ठरवा. तरचं तुमचे अंतर्मन त्यांचा स्विकार करेल. त्याचबरोबर परिश्रम, जिद्द आणि चिकाटी उराशी बाळगल्यास ते ध्येय साध्य होईल. असे बहुमोल मार्गदर्शन शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले.
शिक्षण क्षेत्रातील अग्रमानांकित अशा संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक संकुलातील ज्ञानगंगा विद्यानिकेतन व महाराजा यशवंतराव होळकर पब्लिक स्कूल येथे आयोजित सांस्कृतिक कला महोत्सवात दुसऱ्या दिवशी मार्गदर्शन करताना अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मार्गदर्शक डॉ. शैलेंद्रसिह होडगर होते. अँड. सुनिल गेठे, दिग्विजयसिंह होडगर, विजय पिसे हे यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शैलेंद्रसिंग होडगर यांनी यावेळी भाषणात बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच यावेळी संस्थेचे मार्गदर्शक डॉ. दिग्विजयसिंह होडगर यांनी प्रास्ताविक करताना शिक्षण संकुलात राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करुन हे उपक्रम येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्याबरोबर त्यांना ध्येय निश्चित करण्यासाठी मार्गदर्शक ठरतील असा विश्वास व्यक्त केला.
याआधी अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांना एनसीसीच्या विद्यार्थ्यानी संचलन करत मानवंदना दिली. तसेच संजय महाराज पाचपोर यांच्या प्रेरणेतून शाळेत पशु - पक्षांसाठी पाणी आणि चारा उपलब्ध व्हावा यासाठी उभारण्यात आलेल्या ‘जीवदया’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रदीप जगताप यांनी करुन दिला.
यानंतर विद्यार्थ्यानी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कलाविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. दोन्ही दिवस संस्थेचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर, सौ. शीलाताई होडगर यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत गमे, अनिल जोशी, छाया गाडेकर आणि सोनाली सूर्यवंशी यांनी केले. तर, कार्यक्रमाचे आभार शीतल सांबरे यांनी मानले.
दरम्यान दोन दिवस चाललेल्या कला महोत्सवात पहिल्या दिवशी आदिवासी विभागाच्या नाशिक विभागीय आयुक्त नयना गुंडे आणि दुसऱ्या दिवशी शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांचे मार्गदर्शन ऐकून विद्यार्थी भारावल्याचे चित्र पहावयास मिळाले.
याप्रसंगी विजयराव टुले, संस्थेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बलमे, सेक्रेटरी नीलिमा गुणे, मुख्याध्यापिका योगिता दुकळे, आश्विन महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. सजीव लोखंडे, प्राचार्या डॉ. शामल निर्मळ, प्राचार्य डॉ. नितिन आहेर, डॉ. मोहन मोरे, अतुल खपके, संदीप हिरगळ, ईबिन के. व्हि. महेश हळनोर, चीफ अकाऊंटंट राजू बोंद्रे, हर्षदा भावसार, किसन हजारे, प्रवीण गाढे, सुनिल आढाव, सोन्याबापू वर्पे, गंगाधर चिधें, नितिन गिते, हौशिराम डमाळे, शीतल सांबरे, सुनिता गुंगले, शशिकांत गमे, पंडितराव डेंगळे, नानासाहेब वडीतके, सचिन भाकरे, प्रा. दत्ता शिंदे, डॉ. शिवपाल खंडीझोड, धनंजय देशमुख, रंगनाथ गिते, शशिकांत देशमुख, विजय वर्पे, सोपान राशीनकर, संजय शिंदे, विलास गायकवाड, प्रा. प्रदीप जगताप यांच्यासह संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
सर्व छायाचित्रे सौजन्य -भाऊसाहेब ताजणे