पोलीस नाईक अनिल शेंगाळे यांचा ‘टॉप कॉप ऑफ द मंथ’ पुरस्काराने गौरव!
◻️ श्रीरामपूर, राहुरीसह आश्वी परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव
संगमनेर LIVE | मुख्यमंत्री कृती आराखड्यांतर्गत ‘टॉप कॉप ऑफ द मंथ’ ही योजना जानेवारी २०२५ पासून सुरू करण्यात आली आहे. नुकताचं पोलीस दलातील मानाचा ‘टॉप कॉप ऑफ द मंथ’ हा पुरस्कार श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अनिल शेंगाळे यांना देऊन गौरविण्यात आले आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमात पोलीस नाईक अनिल शेंगाळे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे आणि प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी रॉबिन बंसल यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीरामपूर, राहुरी परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरीकासह पत्रकारांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना त्यांनी मोठा मित्र परिवार जोडला होता. त्यामुळे त्यांच्याकडून ही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.