रिक्षाचालकाने केलेल्या मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
◻️ आरोपी मुजाहीद सनदी पोलीसाच्या ताब्यात ; खुनाचा गुन्हा दाखल
संगमनेर LIVE (गोवा) | गोव्यात एक धक्कादायक घटना घडली असून त्यामध्ये रिक्षाचालकाने केलेल्या मारहाणीत माजी आमदार लवू मामलदार (वय - ६८) यांचे निधन झाले. त्यामुळे एकचं खळबळ उडाली आहे. कॅबला कार घासल्याचेनिमित्त होऊन संतप्त कॅबचालकाने शनिवारी दुपारी बेळगावातील खडे बाजार परिसरात हे कृत्य केले.
लवू मामलेदार हे नियमितपणे बेळगावात येत होते. ते नेहमी खडे बाजार परिसरातील श्रीनिवास लॉजमध्ये उतरत होते. शनिवारी देखील ते याठिकाणी येत होते. त्यांचवेळी त्यांच्या पाठोपाठ कॅबचालक लगेच आला अन् त्यांना मारहाण केली. त्यांना रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान पोलीसांनी रिक्षाचालक तथा टॅक्सी कॅबचालक मुजाहीद शफी सनदी (२५, रा. सुभाषनगर) याच्यावर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करून त्याची रिक्षा देखील जप्त केली आहे.