पानोडी येथे शेतीच्या बांधावरील गवत पेटवण्यावरुन हाणामारी

संगमनेर Live
0
पानोडी येथे शेतीच्या बांधावरील गवत पेटवण्यावरुन हाणामारी

◻️ आश्‍वी पोलीस ठाण्यात परस्परं विरोधी फिर्यादी दाखल

संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे दोन कुटुंबात शेतीच्या बांधावरील गवत पेटवल्यामुळे झालेल्या वादातून हाणामारी आणि शिविगाळ झाली. गुरुवार दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ही घटना घडली असून आश्‍वी पोलीस ठाण्यात याबाबत परस्परं विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

याबाबत आश्‍वी पोलीसांनी दिलेलेल्या माहितीनुसार पानोडी येथील प्रियंका कराड यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मळ्यातील शेताच्या बांधावरील गवत पेटवल्यावरुन आरोपी सुभाष पवार, मंगल पवार (रा. पानोडी) आणि त्यांचा जावई रोहीत बोंद्रे (रा. शिबलापूर), विकी कदम, पिप्रीं येथील पिंजारी आणखी दोघे तीघे यांनी गुरुवार दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घरी येऊन वाद घातला. यावेळी त्यांनी चुलत सासरे कैलास कराड यांना काठीने मारहाण केली. 

तसेच फिर्यादी प्रियंका कराड, मावळण सासु हिराबाई ओबासे, विमल सांगळे, सासु सुशीला कराड, कमल कराड यांना देखील मारहाण करत गळ्यातील सोन्यांचे मंगळसुत्र व गंठण तोडले. याप्रसंगी जखमी झालेल्या सर्वानावर आश्‍वी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. 

त्यामुळे गुन्हा रजिस्टर नंबर २४/२०२५ बीएनएस कलम २०२३ नुसार ११९ (१), ११८ (१), ११५ (२), १८९ (२), १९१(२), ३३३, १३१, १९०, ३५२, तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), ३७ (३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर मंगल पवार यांनी दाखल केलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, पती सुभाष पवार यांनी शेतातील बांधावरील वाळलेले गवत पेटवले होते. त्यामुळे आरोपी कैलास कराड यांनी गुरुवार दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरी येऊन मला व पतीला शिवीगाळ केली. यावेळी जावई रोहीत बोंद्रे हे समजावून सांगण्यासाठी गेले असता कराड यांनी त्यांना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. 

तसेच आरोपी कराड यांची भावजय सुशिला (पुर्ण नाव माहीत नाही), दोन बहीणी विमल व कमल (पुर्ण नाव माहीत नाही), बबन कराड, संदीप कराड यांनी देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पवार पती - पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

त्यामुळे गुन्हा रजिस्टर नंबर २५ / २०२५ बीएनएस कलम ११८ (१), ११५ (२), १८९ (२), १९१(२), १९१(३), १९०, ३५२, ३५१ (२) (३) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लखन कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान या दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुक्रमे पोलीस उपनिरीक्षक शरद आहेर आणि पोलिस उपनिरीक्षक शिवाजी पवार हे करत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !