महात्मा फुले यांनी सर्वप्रथम शिवजयंती सुरू केली - भाऊसाहेब गिते
◻️ आश्वी बुद्रुक येथील जिल्हा परीषद प्राथमिक मुलींच्या शाळेत छत्रपती शिवरायांना अभिवादन
संगमनेर LIVE | १८६९ साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम शिवजयंती उत्सव सुरू केला. जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता. सुरुवातीच्या काळात शिवजयंती फक्त महाराष्ट्रात साजरी होत होती. परंतु २० व्या शतकाच्या पहिल्या दशकात शिवजयंतीचा उस्तव बंगालमधे जाऊन पोहोचला. असल्याचे मनोगत मुख्याध्यापक भाऊसाहेब गिते यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील जिल्हा परीषद प्राथमिक मुलींची शाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना ३९५ व्या जंयतीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच नामदेव शिदे, मुख्याध्यापक भाऊसाहेब गिते, संगिता क्षिरसागर, लता बिडवे, रंजना शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे शंशिकांत शिंदे, जऱ्हाड यांच्यासह पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्याध्यापक भाऊसाहेब गिते म्हणाले की, बंगालमधे शिवजयंतीची सुरुवात करण्याचे श्रेय 'सखाराम गणेश देऊस्कर' यांना जाते. ते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते, १९०२ साली त्यांनी बंगालमध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला. देऊस्कर जन्माने महाराष्ट्रीय परंतु बंगाल मध्ये स्थायिक होते. पुढे १९०५ मधे जेव्हा लॉर्ड कर्झनने बंगाल फाळणीचा प्रस्ताव आणला, तेव्हा हा उत्सव अधिकच लोकप्रिय झाला. शिवरायांच्या प्रेरणेने ब्रिटिशांविरोधात जनमत तयार करण्यास या उत्सवाची बरीच मदत झाल्याचे देखील त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थीनींनी शिवाजी महाराजांचा जीवनपट भाषणे, गाणी तसेच पोवाडे सादर करत उलगडून दाखवला असता उपस्थितांच्या चेहऱ्यावर छत्रपती शिवरायां प्रती असलेली कृतज्ञतेचे भाव स्पष्ट दिसत होते.
दरम्यान इयत्ता ४ थी ची विद्यार्थीनी आराध्या ताजणे हिने यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभुषा केली होती असता वारंवार उपस्थिताचे लक्ष वेधून घेत होती. याप्रसंगी तेजस्वीनी चव्हाण आणि आरोही घोलप यांनी पोवाडा सादर केला आहे.