दोन हजारांपेक्षा अधिक संख्येने धावले संगमनेरकर!
◻️ सफायर मॅरेथॉनमध्ये लहानग्यांपासून तरूण आणि वृध्दांचा सहभाग
संगमेनर LIVE | लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरच्या वतीने मालपाणी उद्योग समूहाचे प्रेरणास्थान आणि व्यायामाची आवड असणारे उद्योजक स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ सफायर मॅरेथॉन या स्पर्धेचे आयोजन रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजता मालपाणी लॉन्स येथे केले होते.
सकाळी ६.३० वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेमध्ये लहान वयोगटापासून तर तरूण आणि वृध्दांनी आपला सहभाग नोंदविला. अतिशय चैतन्य, उत्साह आणि जोमाने ही स्पर्धा सर्वच स्पर्धकांनी पूर्ण केली. ७ किमी आणि १० किमी अशा दोन गटात ही मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. यावर्षी लहान मुले-मुली यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. अनेक वृध्दांनी १० किमी स्पर्धा पूर्ण करत ‘सौ शहरी एक संगमनेरी’ ही उक्ती सार्थ केली.
स्पर्धेचे हे १२ वे वर्ष होते. क्लबचे संस्थापक अध्यक्ष व सफायर मॅरेथॉनचे प्रणेते उद्योजक गिरीश मालपाणी, माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, प्रफुल्ल खिंवसरा आणि राजेश मालपाणी यांनी झेंडा फडकवून स्पर्धेला सुरूवात केली. मालपाणी उद्योग समूह, स्वदेश प्रॉपर्टीज, मालपाणी बजाज चेतक यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
Every Runner is Winner या थीमअंतर्गत प्रत्येक स्पर्धकाला सर्टिफिके, मेडल आणि कॅप वितरीत करण्यात आले.
स्पर्धा पूर्ण केल्यानंतर स्पर्धकांना नाश्ता आणि चहा वाटप करण्यात आला. स्पर्धकांनी लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरच्या या स्पर्धेचे कौतुक केले. स्पर्धकांना सर्टिफिकेट आणि मेडल्सचे वाटप मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी, स्वदेश उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब देशमाने, मालपाणी बजाज चेतकचे सचिन पलोड, निलमताई खताळ, सत्यम वारे यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षा स्वाती मालपाणी, सचिव प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, खजिनदार पूजा मर्दा यांच्या अचूक नियोजनामुळे आणि प्रकल्प प्रमुख एमजेएफ सुनिता मालपाणी, कल्याण कासट, अतुल अभंग, चैतन्य काळे, सुदीप हासे, सुमित मणियार यांच्या प्रयत्नांमुळे सफायर मॅरेथॉनला भव्य स्वरूप मिळाले.
प्रकल्प यशस्वीततेसाठी महेश डंग, डॉ. अमोल पाठक, अजित भोत, उमेश कासट, सीए प्रशांत रूणवाल, चंद्रशेखर गाडे, देविदास गोरे, धनंजय धुमाळ, हरज्योतसिंग बत्रा, संतोष अभंग, अमोल भरीतकर, विशाल थोरात, हरमितसिंग डंग, कृष्णा आसावा, नामदेव मुळे, रोहित मणियार, संदीप गुंजाळ, कल्पेश मर्दा, शुभम तवरेज, अक्षय गोरले, अनन्या धुमाळ, डॉ. मधुरा पाठक, मंजुषा भोत, नम्रता अभंग, प्रिती काळे, प्रियंका कासट, वंदना मणियार, मिनल अभंग, अंजली पाटील, चैताली जोर्वेकर, पायल शहा आदी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
उत्तम आरोग्य जपण्यासाठी सफायर मॅरेथॉनचे आयोजन..
दोन हजाराहून अधिक स्पर्धक यावर्षीच्या मॅरेथॉनमध्ये धावले. संगमनेरकरांनी आपले आरोग्य उत्तम ठेवावे हा सफायर मॅरेथॉनचा उद्देश आहे. लहानगे, तरूण, अबालवृध्दांचा जोश आमच्यासाठी स्फूर्ती देणारा होता. लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायर नेहमीच सामाजिक कामांमध्ये पुढाकार घेतो याचा अभिमान आहे असे गिरीश मालपाणी म्हणाले.