७ मार्चपर्यंत शिर्डी शहरातील अवजड वाहतूक वळवली
◻️ प्र. अपर जिल्हादंडाधिकारी अतुल चोरमारे यांचे आदेश
संगमनेर LIVE (अहील्यानगर) | शिर्डी शहराच्या मध्यवर्ती भागातून गेलेल्या नगर - मनमाड रोडवरील वाढत्या ट्रॅफिकमुळे आणि भाविकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणि शहरातील नागरिकांना नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.
त्यामुळे प्र. अपर जिल्हादंडाधिकारी अतुल चोरमारे यांनी शिर्डी शहरातील अवजड व तत्सम वाहतूक दि. ११ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२५ या कालावधीत पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
लक्ष्मीनगर टी पॉईंट, अहिल्यानगर - मनमाड हायवे (पूर्व बाजू) ते आर. बी. एल. बँक चौक, नगर - मनमाड हायवे (पूर्व बाजू) जाणारी अवजड वाहतूक हॉटेल ऋषिकेश, १८ मीटर रिंगरोड ते आर. बी. एल. बँक चौक १८ मीटर रिंगरोड या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
नगर - मनमाड हायवे (पश्चिम बाजू) स्वागत कक्ष ते नगर - मनमाड हायवे जुने कब्रस्तानपर्यंतची वाहतूक काशी अन्नसन्नम ते पानमळा चारी रस्ता, प्रसादालय रोड (पोलीस स्टेशन पासून) ते विद्युत विभाग, महावितरण कार्यालयपर्यंतची वाहतूक शासकीय विश्रामगृह ते विद्युत विभाग महावितरण कार्यालय, एअरपोर्टरोड चौक ते खंडोबा कॉम्प्लेक्सपर्यंतची वाहतूक एअरपोर्टरोड चौक ते १८ मीटर रिंगरोडने आर. बी. एल. बँक चौक व हॉटेल ऋषिकेश,
श्रीराम चौक ते नगर परिषद कार्यालय पर्यतची वाहतूक हॉटेल ऋषिकेश, १८ मीटर रिंगरोडमार्गे आर. बी. एल. बँक चौक, नवीन पिंपळवाडी रोड ते डोखे मार्केट, पिंपळाचे झाड, १५ मीटर रोडपर्यंतची वाहतूक आर. बी. चौक, १८ मीटर रोड ते डोखे मार्केट, पिंपळाचे झाड, मनोजकुमार रोड ते साईश कॉर्नरपर्यंतची वाहतूक हॉटेल सन अँड सँडरोड ते हॉटेल गणपती पॅलेस ते साईश कॉर्नर व धनतारा चौक ते साईबाबा संस्थान गेट क्र. १ पर्यंतची वाहतूक हॉटेल गणपती पॅलेस १८ मीटर रोड ते साईनाथ मंगल कार्यालय, रुईरोड या पर्यायी मार्गे वळविण्यात आली आहे.