माहिती व जनसंपर्क विभागाकडून अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’!

संगमनेर Live
0
माहिती व जनसंपर्क विभागाकडून अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’!

◻️ दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उपक्रम

◻️ अहिल्यानगरमधील नागरीकांना व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन



संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | दि. २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ‘ऑनलाइन जागर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात आपल्या कलागुणांचा व्हिडिओ शेअर करून देश विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.

 या उपक्रमात कसे सहभागी व्हाल?

आपण स्वतः कवी, लेखक, कलाकार, गायक असाल तर आपल्या स्वरचित कवितेचा अथवा आपल्या कलाकृतीचा एक सुंदर व्हिडिओ तयार करून आम्हाला पाठवा. केवळ आपल्याच कविता नाही तर इतर मान्यवर कवींच्या कवितांचे सादरीकरणही (वाचन)आपण करू शकता. याबरोबरच गझल, वाचन, गायन, लोककला सादरीकरण अशा अनेक स्वरूपात आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकता. 

अभिजात मराठीच्या या ऑनलाईन जागरामध्ये आपण अभंग, पोवाडे, नाट्यछटा, लघुकथा, गायन, भारुड आधी कलांच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. अभिजात मराठीच्या या उत्सवात आपला सहभाग हा आपल्या भाषेचा गौरव वाढविणारा ठरेल. तर चला मग करा रेकॉर्ड आपला व्हिडिओ आणि पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडिओ हे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’ या पोर्टल वर आणि महासंचालनालयाच्या राज्यभरातील कार्यालयांच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

अहिल्यानगरमधील नागरिकांनी आपले व्हिडिओ dgiprdlo@gmail.com आणि dionagar12@gmail.com या ईमेलवर अथवा. ९८९२६६०९३३, ७५०४६९६७८६ आणि ९४२०० २२४२२ या व्हॉट्सअँप क्रमांकावर पाठवण्यास सांगितले आहे.

महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. ९८ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेच्या श्रीमंतीचा उत्सव साजरा करण्याची संधी आहे. आपल्या शब्दांनी आणि कलाकृतींनी ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिक संस्मरणीय बनवावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !