लोकनेते बाळासाहेब थोरात हे राजकारणातील संत - साहित्यिक कळमकर

संगमनेर Live
0
लोकनेते बाळासाहेब थोरात हे राजकारणातील संत - साहित्यिक कळमकर

◻️ समाज परिवर्तनात शिक्षण क्षेत्राचे मोठे योगदान - बाळासाहेब थोरात

◻️ सह्याद्री संस्थेत आजी - माजी सेवक व पालकांचा संवाद मेळावा संपन्न

संगमनेर LIVE | निवडणुकांमध्ये जय पराजय होत असतात. परंतु सातत्याने जनतेच्या विकासासाठी काम करणारे नेतृत्व हे जनतेच्या हृदयात असते. अत्यंत स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणे सातत्याने काम करणारे लोकनेते बाळासाहेब थोरात हे राजकारणातील संत असल्याचे गौरवदगार साहित्यिक संजय कळमकर यांनी काढले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालय येथे सह्याद्री संस्थेच्या आजी - माजी पदाधिकारी पालक व सेवकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात, संस्थेचे चेअरमन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, सेक्रेटरी लक्ष्मणराव कुटे, लहानुभाऊ गुंजाळ, डॉ. सोमनाथ सातपुते, साहेबराव कवडे, नानासाहेब गुंजाळ, सिताराम वर्पे, सह सेक्रेटरी दत्तात्रय चासकर, रजिस्टर आचार्य बाबुराव गवांदे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वाढदिवसानिमित्त लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले.

यावेळी बोलताना साहित्यिक कळमकर म्हणाले की, जनतेसाठी जीवन समर्पित करणारे नेते हे जनतेच्या हृदयात असतात. अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कर्तुत्वाने राज्यात तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव पोहोचविले. अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडताना त्या खात्यांना लोकाभिमुख बनवले. संगमनेर तालुका हा जिल्ह्यात नव्हे तर राज्यात विकसित बनवला. निवडणुकीचे पराजय होत असतात परंतु समाजासाठी झटणारे लोकनेते हे जनतेच्या हृदयात असतात.

याचबरोबर सध्याचे जीवन हे धावपळीचे झाले असून जुन्या काळामध्ये जी जवळीक होती ती आता सोशल मीडियाच्या जमान्यांमध्ये राहिली नाही. यावेळी जुने आणि नवीन यामधील अनेक फरक सांगताना त्यांनी सर्वांना खळखळून हसवले.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. आपण शिक्षण मंत्री पदाच्या काळात या विभागातील अडचणी जवळून पाहिल्या आणि जास्तीत जास्त अडचणी सोडवल्या. याचबरोबर मूलभूत शिक्षणाचा अधिकार हा हक्क राबविला. आगामी काळातही शिक्षणातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी संघटितपणे आपल्याला काम करावे लागणार आहे. सह्याद्री संस्थेने गुणवत्तेने काम केल्यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी निर्माण झाली असून तालुक्याच्या शैक्षणिक वाटचालीत सह्याद्री संस्थेचे मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले.

चेअरमन डॉ. तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमने हे शैक्षणिक केंद्र ठरले आहे. सह्याद्री संस्थेने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरता सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. आगामी काळामध्ये शिक्षणातील नवीन प्रणालींबरोबर विविध कंपन्यांशी टाईप आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सह्याद्री कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रजिस्टर बाबुराव गवांदे यांनी केले. तर प्राचार्य डॉ बाळासाहेब वाघ यांनी आभार मानले. याप्रसंगी सह्याद्री संस्थेतील आजी - माजी कर्मचारी व पदाधिकारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !