सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची शक्ती द्या - आमदार अमोल खताळ
◻️ जेजुरीच्या मल्हार मार्तडचे आमदार खताळ यांनी घेतले दर्शन
◻️ तालुक्यातील होलम राजाच्या मानाच्या काठीला मल्हार गडावर यावर्षीचा प्रथम मान
संगमनेर LIVE | “बोल सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार” असा जयजयकार करत भंडार खोबऱ्याची मुक्त उधळण करत जेजुरी येथे मानाची काठी शिखरी सोहळा पार पडला. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी पत्नी समवेत जाऊन मल्हार मार्तड खंडोबा महाराजांची पूजा आणि आरती केली. याप्रसंगी त्यांनी संगमनेर तालुक्यातील सर्वसामान्य माय बाप जनतेची सेवा करण्यासाठी शक्ती द्या. अशी प्रार्थना करत खंडोबा महाराज यांचे दर्शन घेतले.
श्रीक्षेत्र जेजुरी येथे माघ पौर्णिमेच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने खंडोबा महाराजांचे भाविक भक्त आपल्या कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जेजुरीत दाखल झाले. त्यात सर्वात जास्त भाविक संगमनेर तालुक्यातून आले होते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यात्राउत्सवाच्या निमित्त देवाला काठी भेटविण्याचा शिखरी काठी सोहळा बोल सदानंदाचा येळकोट येळ कोट येळकोट जय मल्हार असा जयजय कार करत भंडाऱ्याची मुक्त उधळण केली गेली.
जेजुरीतील मल्हार गडावर यावर्षीचा प्रथम मान संगमनेर येथील होलम राजाच्या मानाच्या काठीला देण्यात आला. संगमनेर तालुक्यातील लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी निलम खताळ यांच्या हस्ते विधिवत पूजाआरती करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत संगमनेर येथील हजारोच्या संख्येने भावीकभक्त या शिखरी काठी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. काठी बरोबर आमदार खताळ हे सुद्धा मल्हार गडावर गेले होते. त्यानंतर त्यांनी संपत्नीक मल्हार मार्तडची पूजा करून दर्शन घेतले.
याप्रसंगी जेजुरी देव स्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, ॲड. विश्वास पाणसे, ॲड. पांडुरंग थोरवे, व्यवस्थापक आशिष बाठे, पुजारी धनंजय आगलावे व चारुदत्त आगलावे, संगमनेर येथील होलम राजा काटकर मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काठे, उपाध्यक्ष भिकाजी गुंजाळ, सेक्रेटरी दिलीप गुंजाळ, पुजारी काशिनाथ होलम, मनाचे वाघे स्वप्नील राहणे यांच्यासह होलमराजा भक्त मंडळ व संगमनेर कर खंडोबाभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगमनेर येथील मानाच्या होलम राजाच्या मानाच्या काठीची पूजा व दर्शन लोकप्रतिनिधी या नात्याने घेतले. खंडोबा भक्त या नात्याने जेजुरीला मल्हार मार्तंडाच्या दर्शनाला येऊन आशीर्वाद घेत असतो. संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने जेजुरीला येऊन होलम राजाच्या काठीचे दर्शन घेऊन सर्वांना सुख समृद्धी लाभो. अशी प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी दिली.