अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या ३१ विद्यार्थ्याची इन्फोसिस व वार्ली कंपनीत निवड
◻️ गुणवत्तापुर्ण शिक्षण हेच अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे ध्येय - शरयु देशमुख
संगमनेर LIVE | अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या कॅम्पस मुलाखतीमध्ये इन्फोसिस या बहुराष्ट्रीय कंपनीत १८ विद्यार्थ्याची प्रती वर्ष ३.६ लाख या पॅंकेजवर आणि वार्ली या कंपनीमध्ये १० विद्याथ्यांची प्रती वर्ष ५.८ लाख या पॅकेजवर तसेच फीन सोल्युरान या कंपनीत ३ विद्यर्थ्याची प्रती वर्ष ३.१ लाख या पॅकेजवर निवड झाली आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली.
इन्फोसीस या कंपनीमध्ये सर्व शाखांतील विद्याथ्यांची प्लेसमेंट झाली असुन विद्यार्थ्यानी मुलभुत ज्ञान, संकल्पना, तांत्रिक कौशल्य आणि व्यक्तीमत्व विकासाची कौशल्य आत्मसात केल्यास प्लेसमेंट नक्की होते. असे मत डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्लेसमेंट अधिकारी प्रा. प्रविण वाकचौरे यांनी सांगितले की, आतापर्यत २०२४-२५ या वर्षीच्या १२७ विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली असुन अजुन पाच महिन्यांच्या अवधीत सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळणार आहे. याकरीता त्यांनी व्यवस्थापन, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचे अभिनंदन केले व आभर मानले.
सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी १९८३या वर्षी सुरु केलेल्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय गुणवत्तेसाठी अव्वल ठरलेले आहे. चार वेळा एम. बी .ए. नामांकन, नॅक पुनर्मुल्यांकनामध्ये ‘ए प्लस’ दर्जा, आय. एस. ओ. मानांकन यामुळे महाविद्यालयीन गुणवत्ता दर्जा सतत टिकून आहे. नुकतेच महाविद्यालयास स्वायतत्ता २०२५-२६ या वर्षापासुन मिळालेली असुन महाविद्यालयात यानंतर बी. टेक, एम. टेक ही पदवी प्राप्त होणार आहे.
दरम्यान माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विश्वस्त शरयु देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डायरेक्टर अकेडेमिक्स डॉ. जे. बी. गुरव, रजिस्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे यांचे नियोजनाखाली महाविद्यालयात नवनवीन उपक्रम सुरु असल्याची माहिती देण्यात आली.
गुणवत्तापुर्ण शिक्षण हेच अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे ध्येय असुन विद्यार्थ्याची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्लेसमें होत आहे. नुकतेच महाविद्यालयास स्वायतत्ता (ऑटोनॉमस) मिळालेले असुन बी. टेक, एम. टेक पदवीसह भविष्यात यापेक्षा ही जास्त प्लेसमेंट मिळण्यास मदत होणार आहे. सध्या महाविद्यालयातील सर्व पात्र विद्यार्थ्याना प्लेसेंट मिळत असुन पालक वर्गात मोठे समाधान दिसत आहे. अशी प्रतिक्रिया व्यवस्थापकीय विश्वस्त शरयु देशमुख यांनी दिली.