न भरणारे जाणता राजा मैदान लाडक्या बहिणीनी भरूवून दाखवले - डॉ. विखे

संगमनेर Live
0
न भरणारे जाणता राजा मैदान लाडक्या बहिणीनी भरूवून दाखवले - डॉ. विखे

◻️ लहान मुलांबरोबरच डॉ. सुजय विखे आणि आ. अमोल खताळ यांचा ‘झिंगाट’ आणि ‘मै हु डॉन’
 गाण्यावर ठेका 

◻️ गौरी दगडू ठरल्या एक तोळा सोन्याच्या हाराच्या मानकरी 

संगमनेर LIVE | जनसेवा फाउंडेशनच्या वतीने मकर संक्रांती निमित्त संगमनेर विधानसभा मतदारसंघातील खास महिलांसाठी खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा या उपक्रमा अंतर्गत घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात झालय झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट आणि मै हु डॉन या गाण्याच्या तालावर लहान बालगोपाळां मध्ये सहभागी होऊन माजी खा. डॉ. सुजय विखे व आ अमोल खताळ यांनी ठेका धरत नृत्य सादर केले. त्यांच्या साथीला उपस्थित असलेल्या महिलांनी सुद्धा या गाण्याच्या तालावर ठेका धरत नृत्य सादर करत एकच जल्लोष साजरा केला.

राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्या नगर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि रणरागिनी महिला मंडळ अध्यक्षा धनश्रीताई विखे व संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारातून शहरातील जाणता राजा मैदानावरती खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व महिलांना संक्रातीचे वाण म्हणून जेवणाचा डबा भेट देण्यात आला. 

डॉ. सुजय विखे त्यांच्या पत्नी सौ. धनश्रीताई विखे व आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ यांनी या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांचे स्वागत केले.

यावेळी निवेदक संदीप पाटील यांनी उपस्थित असलेल्या महिलांचे रस्सीखेच संगीत खुर्ची लंगडी घालून बॉल पकडणे, विविध गाण्यांवरती नृत्य सादर करणे व कॉमेडी करणे या सारख्या अनेक स्पर्धा घेतल्या या स्पर्धांमधून विजेत्या ठरलेल्या महिलांना पैठणी देऊन सन्मान केला.

जमा झालेल्या कुपनामधून लकी ड्रॉ काढण्यात आला. या लकी ड्रॉ सोडतीत संगमनेर शहरातील गौरी नितीन दगडू ही महिला एक तोळे वजनाच्या सोन्याच्या हाराची मानकरी ठरली तर, विभावरी संतोष वाकचौरे आणि शीतल संतोष देशमुख या दोन महिलांना, ४० इंची सोनी कंपनीची एलईडी टीव्हीच्या द्वितीय क्रमांकाच्या, शितल संतोष शेवंते आणि कल्याणी आप्पासाहेब दरेकर या दोन महिला सॅमसंग कंपनीचे डबलडोअर फ्रिजच्या तृतीय क्रमांकाच्या तर, डॉ. वर्षा अजिंक्य उपासनी आणि वनिता किरण लहारे या दोन महिला ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन च्या चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी ठरल्या, तसेच एअर कुलर, वॉटर प्युरी फायर, प्रेस्टीज मिक्सर, वंडरशेफ ओव्हन, प्रेस्टीज व्हॅक्यम क्लिनर, प्रेस्टीज इंडक्शन आदी वस्तू बक्षीस देऊन गौरव करण्यात आले.

“मुझको पहेचान लो मैं हूँ डॉन” या गाण्या वर भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी ‘ठेका धरत डान्स केला.

हे जाणता राजा मैदान कधीच भरत नाही. असे काहीजण म्हटले होते. परंतु संगमनेरच्या लाडक्या बहिणींनी हे जाणता राजा मैदान भरून दाखवलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. असा खोचक टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता डॉ. सुजय विखे यांनी लगावला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !