संगमनेर शहरातील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
१२०० किलो गोमांस सह ९ लाख २२ हजार ७०० किंमतीचा मुद्देमाल जप्त
संगमनेर LIVE | अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हेच्या पथकाने संगमनेर शहरात कत्तलखान्यावर मोठी कारवाई केली असून आरोपींकडून १२०० किलो गोमांस सह ९ लाख २२ हजार ७०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, अशोक लिपणे, मनोज लातुरकर, विशाल तनपुरे यांचे पथक तयार करुन कारवाई करणेबाबत सूचना दिल्या होत्या.
दि. २५/०२/२०२५ रोजी हे पथक संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जमजन कॉलनी संगमनेर येथे अब्दुलसमद कुरेशी त्याचे पत्राचे शेडमध्ये काही इसमांच्या मदतीने गोवंशी जातीचे जनावरे कत्तल करण्यासाठी डांबुन ठेवले आहेत व कत्तल करत आहेत.
तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष या ठिकाणी गेले असता एका पत्र्याचे शेडमध्ये गोवंश जातीचे जनावरे निदर्यतेने डांबुन ठेवलेले व ४-५ इसम हे गोवंश जनावरांची कत्तल करत असताना मिळून आले. पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता काही जण पळून गेले. यावेळी पोलीसानी मुनावर कुरेशी (वय - ४०, रा. जमजम कॉलनी, ता. संगमनेर) याला ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे पळून गेलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता अदनान कुरेशी (फरार), तबरेज कुरेशी (फरार) (दोन्ही रा. भारतनगर, संगमनेर) इतर दोन पळून गेलेल्या इसमांची नावे माहित नसल्याचे सांगीतले.
घटनाठिकाण कोणाच्या मालकीचे आहे व गोवंश जनावरांची कत्तल कोणाच्या सांगण्यावरून केली असल्याची माहिती विचारता त्याने अब्दुलसमद कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) (फरार) याचे असून त्याचे सांगणेवरून गोवंशी जनावरांची कत्तल केलेबाबत सांगितले.
पथकाने घटनाठिकाणावरून ३ लाख ६० हजार रू किमतीचे १२०० किलो गोमांस, ६० हजार रूपये किंमतीच्या तीन गोवंशी जातीचे कालवडी, २ हजार रूपये किंमतीचा वजन काटा, ७०० रू किंमतीची लोखंडी कुऱ्हाड व सुरा व ५ लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो (एमएच - १४ - एफटी- १४५०) असा एकुण ९ लाख २२ हजार ७०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यावेळी आरोपीविरूध्द संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १३३/२०१५ बीएनएस २०२३ चे कलम २७१, ३२५, ३(५) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.