यशवंतराव होळकर पब्लिक स्कूलला ‘उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार’
◻️ गीता परिवार आयोजित स्पर्धेत मांचीहिल संकुलातील शाळेचा गौरव
◻️ संगमनेर तालुक्यातील १८३ शाळांतील २० हजार विद्यार्थ्याचां सहभाग
संगमनेर LIVE | संगमनेर येथील गीता परिवाराने नुकतेच ‘शक्ती भक्ती संस्कार संगम २०२५’ या सामूहिक सूर्य नमस्कार आकर्षक छायाचित्र स्पर्धेचे आयोजन येथे केले होते. या स्पर्धेत तालुक्यातील १८३ शाळांतील २० हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये मांचीहिल शिक्षण संस्थेतील यशवंतराव होळकर पब्लिक स्कूलच्या छायाचित्राचा उत्कृष्ट छायाचित्र म्हणून गौरव करण्यात आला.
या स्पर्धेत श्रीमद् भागवत गीता बारावा अध्याय पाठांतर स्पर्धेत ६० विद्यार्थ्यानी देखील सहभाग नोंदवून विशेष प्राविण्य मिळविले आहे. विद्यालयाचे कला व क्रीडा शिक्षक पंडितराव डेंगळे यांनी यासाठी विद्यार्थ्याना विशेष मार्गदर्शन केले होते.
यावेळी गीता परिवाराचे अध्यक्ष संजय मालपाणी, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडूस, सो. ता. कळसकर (गुरुजी), डॉ. माणिकराव शेवाळे, प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे, जेष्ठ पत्रकार किसन हासे आदिच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन शाळेला गौरवण्यात आले. या पुरस्काराचा स्विकार शिक्षक पंडितराव डेंगळे यांनी केला.
दरम्यान विद्यालयाच्या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अॅड. शाळीग्राम होडगर, संचालिका नीलिमा गुणे, अध्यक्ष विजय पिसे आदीनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.