अर्थ संकल्पातील तरतुदीमुळे दुष्काळ मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल
◻️ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
◻️ शिर्डी विमानतळ विकासासाठी १ हजार ३६७ कोटी रूपयांचा निधीची घोषणा
संगमनेर LIVE (शिर्डी) | विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आशा राज्यातील नदीजोड प्रकल्पाला निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पातील तरतुदीने मोठे पाठबळ मिळेल. गोदावरी पुनर्भरण आणि मराठवाडा ग्रीडसाठी केलेल्या अर्थिक तरतुदीमुळे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे महायुती सरकारचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त करून अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या पायाभूत सुधिधांकरीता पाठबळ देणारा असल्याचे स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यातील सिंचन प्रकल्पाकरीता सिंचन सुधारणा कार्यक्रमासाठी नाबार्डच्या सहकार्याने ५०० कोटी रुपयांची केलेली तरतूद महत्वपूर्ण आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार याचाही मोठा लाभ शेतकऱ्यांना होईल आशी अपेक्षा आहे.
कोकणवाहीनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आल्याकडे लक्ष वेधून मराठवाड्यातील २ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्राला पाणी उपलब्ध करण्यास महायुती सरकारचे प्राधान्य असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प पूर्ण होण्यास मोठी मदत होणार असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.
राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभे असून, कृत्रिम बुध्दीमतेचा वापर करून कृषी क्षेत्रातील सुधारणेचे मार्गदर्शन ५० हजार शेतकऱ्यांना होण्यासाठी घेतलेला निर्णय सुध्दा महत्वाचा ठरेल. शेतकऱ्यांसाठी स्मार्ट कार्यक्रम, आंतराष्ट्रीय सहकार वर्ष आणि हरीत उर्जेतून सौर पंप योजनेला गती मिळेल असा विश्वास वाटतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वासाठी घरे योजनेला महायुती सरकारने मिशन मोडवर राबविण्याचा निर्णय घेतानाच घरासाठी सौर उर्जा संच उपलब्ध करून देण्यासाठी ५० हजार रूपयांचे अनुदान निर्णय सुध्दा लाभार्थीना दिलासा देणारा ठरेल.
महीला बचत गटांच्या चळवळीला पाठबळ देतानाच २४ लाख लखपती दिदि बनविण्याचे उद्दीष्ट्य महायुती सरकार पूर्ण करेल असे मंत्री विखे पाटील म्हणाले.
शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी १ हजार ३६७ कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. या विमानतळाला प्रमुख विमानतळ करतानाच नाईट लॅण्डीग सुविधा तातडीने सुरू करण्याच्या निर्णया मोठा लाभ जिल्ह्यातील औद्योगिक आणि अध्यात्मिक पर्यटनासाठी होईल.
ग्रामीण आणि शहरी भागातील रस्ते विकासाला या अर्थ संकल्पातून भक्कम आधार मिळणार असून औदयोगिक विकासातून रोजगार निर्मितीवर महायुती सरकारने लक्ष केंद्रीत केले असल्याचे अर्थसंकल्पातून दाखवून दिले आहे. असेही ते यावेळी म्हणाले.