गांधी हॉस्पिटलच्या सेवा निवृत्त महिलांना सातवा आयोग लागु करावा - सौ. साळवी
◻️ मंत्री विखे पाटील यांच्याकडे डॉ. विखे पाटील कृषी परिषदेची निवेनाद्वारे मागणी.
संगमनेर LIVE (नवी मुंबई) | गांधी हॉस्पिटल सेवा निवृत्त महिला सेविकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा या मागणीसाठी पद्मश्री डॉ. विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांना निवेदन देण्यात आले.
कृषी परिषदेच्या मुंबई अध्यक्षा सौ. अनुजा साळवी यांनी गांधी हॉस्पिटल मधील सेवा निवृत्त महिला कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाप्रमाणे मानधन मिळवे या मागणीसाठी सेवा निवृत्त महिला सेविकांच्या शिष्टमंडळासह जलसंपदा मंत्री ना. विखे पाटील यांची नुकतीच भेट घेऊन सविस्तर माहिती दिली.
कृषी परिषदे मार्फत संबधित आरोग्य विभाग तसेच गांधी हॉस्पिटल मध्ये या विषयाचा पाठपुरावा सुरू आहे. तसेच आरोग्य मंत्रालय, राज्य कामगार विमा योजना आयुक्त, महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल अधीक्षक आणि अकाउंट डिपार्टमेंट यांचा देखील पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र वारंवार संबंधित अधिकारी आणि कार्यालयाकडून दिशाभूल आणि टाळाटाळीची उत्तरे मिळत असल्याची बाब मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आणुन देण्यात आली.
दरम्यान सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मंत्री विखे पाटील यांनी न्याय मिळवून द्वावा अशी विनंती कृषी परिषदेच्या वतीने करण्यात आली असून मंत्री विखे पाटील यांनी त्यांस सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे शिष्टमंडळाला दिलासा मिळाला आहे.