मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतंर्गत संगमनेरचे १६८ ज्येष्ठ नागरिक अयोध्येला रवाना
◻️ रवाना होण्यापूर्वी नागरिकांचा आमदार अमोल खताळ यांनी केला सन्मान
◻️ पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून ४ वातानुकूलित बसेस भाविकांना घेऊन रवाना
संगमनेर LIVE | महायुती सरकारने जेष्ठ नागरीकांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजने अंतर्गत जिल्ह्यातील ७८५ तर संगमनेर तालुक्यातील १६८ ज्येष्ठनागरिक आयोध्या येथील प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी रवाना झाले आहे. या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आ अमोल खताळ यांच्या हस्ते सन्मान करत ४ वातानुकूलित बस अहिल्यानगरकडे रवाना झाल्या.
महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्य मंत्री तिर्थदर्शन योजनेचा लाभ अहिल्यानगर जिल्ह्यतील जेष्ठ नागरीकांना होण्यासाठी पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे यांनी पुढाकार घेतला आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी दाखल होणाऱ्या अर्जाना तातडीने मंजूरी मिळावी म्हणून त्यांचा व्यक्तिगत पाठपुरावा सुरू होता.
त्यातुन संपूर्ण जिल्ह्यातील ७८५ तसेच संगमनेर तालुक्यातील विविध गावातील १६८ जेष्ठ नागरीकांनी ग्रामपंचायतमध्ये आपले अर्ज दाखल झाले होते. या सर्व कागदपत्रांची पूर्तता असलेल्या अर्जाना मंजूरी मिळाली होती मात्र आयोध्या येथे जाण्यासाठी जिल्ह्यातील जेष्ठनागरीकांना अहील्यानगर येथून रेल्वेची व्यवस्थाकेली आहे.
मात्र संगमनेर येथून अहील्यानगर पर्यत जाण्यातील अडचण लक्षात घेवून मंत्री विखे पाटील यांनी ४ आरामदायी बसची व्यवस्था करून दिली आहे. संगमनेर तालुक्यातील विविध गावातुन आलेले १६८ ज्येष्ठ नागरिक संगमनेर बसस्थानकातून अहील्यानगरकडे रवाना झाले.
या सर्वाना शुभेच्छा देण्याकरीता आमदार अमोल खताळ व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खताळ यांनी अयोध्येला जाणाऱ्या सर्वच जेष्ठ नागरीकांचा प्रभू श्रीरामाची शाल देवून सत्कार केला. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यानी ‘जय श्रीराम’ घोषाणा दिल्यामुळे बसस्थानकाचा परिसर दुमदुमूला होता.
याप्रसंगी मुख्याधिकारी रामदास कोकरे, प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, संगमनेर पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप समनापुरचे ग्रामपंचायत अधिकारी सुनील नागरे, निमजचे ग्रामपंचायत अधिकारी रामनाथ मालुंजकर यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे भाजपाचे राम जाजू, डॉ. सोमनाथ कानवडे काशिनाथ पावसे, सुधाकर गुंजाळ, राजेंद्र सांगळे, राहूल भोईर, वरद बागुल, वडगावपानचे सरपंच श्रीनाथ थोरात, शिवाजी आहेर, साहेबराव वलवे, सुमित काशिद, संदेश देशमुख आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली. ती महायुती सरकारच्या माध्यमातून चालू आहे. राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचा लाभ संपूर्ण तालुक्यातील जेष्ठ नागरीकांना मिळवून देणार आहोत. जेष्ठाच्या चेहऱ्यावरील आनंद समाधन देणारा असल्याची भावना आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त करत सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.