“संगमनेर येथे परिवर्तन झाल्यानंतर काही जण शिवजयंती साजरी करू लागले”
◻️ आमदार अमोल खताळ यांची विरोधकांचे नाव न घेता खोचक टीका
◻️ महायुतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा आणि किल्ल्याचा भव्य देखावा
◻️ छत्रपतीच्या अश्वारुढ पुतळ्यावर जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी व महाआरती
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यात मागील ४० वर्षात साजरी न होणारी शिवजयंती आज खऱ्याअर्थाने आपल्यामुळे साजरी होत आहे. संगमनेर तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतरच काही जण शिव जयंती साजरी करू लागले आहेत. याचा मला आनंद असल्याचा खोचक टोला आमदार अमोल खताळ यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला आहे.
संगमनेर शहरातील बस स्थानकावरती गुरुद्वाराच्या समोर असणाऱ्या प्रांगणात महायुतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा आणि किल्ला देखाव्याचे उद्घाटन आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी निलमताई खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम जेसीबीच्या साह्याने आ खताळ यांनी सपत्नीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यावरती पुष्पवृष्टी करून महाआरती करण्यात आली.
यावेळी आमदार खताळ म्हणाले की, संगमनेरला महायुतीच्या वतीने शिवजन्मोत्सव धुम धडाक्यात साजरा करण्यात येत आहे. येथून पुढील कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम महा युतीच्या वतीने घेतले जाणार आहे. महायुती आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आयोजित सर्व कार्यक्रमामध्ये तसेच मिरवणुकीत शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान यावेळी संगमनेरकरासह तालुक्यातून आलेले शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.