तुम्ही एकजूट दाखविली तर, गणेश उर्जितावस्तेत येईल - बाळासाहेब थोरात
◻️ गणेश साखर कारखान्याच्या ६३ व्या गाळप हंगामाची सांगता
◻️ मका पासुन इथेनॉल निर्मितीसाठी गणेशचे प्रयत्न
संगमनेर LIVE (राहाता) | ऊसाचा तुटवडा आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे जिल्ह्यातील प्रत्येक कारखान्याचे उदिष्टापेक्षा २५ टक्के गाळप यंदा कमी झाले. गणेश कारखान्यानेही यंदा उदिष्टापेक्षा काहिसे कमी गाळप केले असले तरी, आता पुढील हंगामाची चांगली तयारी करा, संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी कामगार, यांनी एकजूट दाखवत हा कारखाना आपला आहे. अशी भावना ठेवून काम करा, गणेशला उर्जितावस्थेत येण्यास वेळ लागणार नाही. असे प्रतिपादन गणेशचे मार्गदर्शक माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या ६३ व्या गाळप हंगामाची सांगता काल झाली. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे होते. संजिवनीचे अध्यक्ष तथा गणेशचे मार्गदर्शक विवेक कोल्हे, गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीरराव लहारे, उपाध्यक्ष विजयराव दंडवते, माजी चेअरमन, जेष्ठ संचालक अॅड. नारायणराव कार्ले, माजी व्हा. चेअरमन शिवाजीराव लहारे, संगमनेर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, संजिवनीचे जनरल मॅनेजर दिवटे, माजी संचालक आप्पासाहेब बोठे, संजय शेळके, गंगाधर चौधरी, भाऊसाहेब चौधरी, सचिन चौगुले, धनंजय गाडेकर, राजेंद्र अग्रवाल, चंद्रभान गुंजाळ, अविनाश दंडवते, जयराज दंडवते, विक्रम दंडवते, अॅड. पंकज लोंढे, नितीन सदाफळ, शंकरराव जेजुरकर, विलासराव टिळेकर, चंद्रभान धनवटे, बाळासाहेब आहेर, भारत तुरकणे, सुभाष निर्मळ यांचेसह संचालक मंडळातील सदस्य, सभासद, ऊस उत्पादक, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, ऊस गाळपात आणि साखरेच्या दरात चढउतार सुरु असतो. परंतु प्रत्येक जण आपला कारखाना व्यवस्थित गाळप करुन बाहेर काढत असतो. यंदा ऊसाचा तुटवडा जाणवल्याने सर्वच कारखान्यांचे ऊस गाळप उदिष्ट साध्य झाले नाही. गणेश कारखाना उर्जितावस्थेत आणायचा असेल तर या परिसराचीच मोठी जबाबदारी आहे. संचालकांनी, कामगारांनी, सभासद, ऊसउत्पाकांनी हा कारखाना माझा आहे, असे समजले पाहिजे.
कारखाना चांगला चालवा, रिझल्ट चांगला द्या, पुढील काळात गणेश उर्जितावस्थेत आल्याशिवाय राहाणार नाही. मागील हंगामात मोठ्या अडचणी होत्या. कर्ज उशीरा मिळाले, त्यावर मात करत कारखाना चालविला. कोल्हे व मी या ठिकाणी राजकारण करत नाही. गणेश चांगला चालला तर आम्हाला समाधान मिळेल. पुढील हंगामात गणेशच्या कार्यक्षेत्रात २ लाख ऊस निर्माण होईल. पाटपाण्याची स्थिती चांगली राहिल. त्यामुळे गणेश कारखाना चार लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करेल, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.
विवेक कोल्हे म्हणाले, गणेश ने या गाळप हंगामात १ लाख ९८ हजार गाळप केले. साखर उतारा १०.६२ टक्के इतका मिळाला. उदिष्टांपेक्षा गाळप कमी असले तरी हंगाम यशस्वी झाला. कार्यक्षेत्रासह बाहेरचा व संजीवनीन देखील गणेशला ऊस दिला. हंगामात ५५ कोटी रुपये देणे होते. पैकी ४० कोटी दिले आहेत. उर्वरित १५ कोटी साखरेवर जिल्हा बँकेकडून उचले प्रमाणे मिळतील. ते ही अदा होतील.
अर्थिक उपलब्धेनुसार कामगारांचे देणे देता येतील. गणेशच्या कार्यक्षेत्रातुन ऊसाची मोठी विल्हेवाट झाली. गणेशचे गाळप क्षमता दैनंदिन ३ हजार मेट्रीक टन करायची आहे. त्यामुळे कारखान्यात सुधारणा करावी लागेल. आसवानी प्रकल्प बंद आहे, तो पुढील हंगामात सुरु करायचा आहे. साडेतीन लाखाहुन अधिक गाळप पुढील हंगामात करु, गाळप जास्त केल्यास तोटा कमी होईल.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्तविक कार्यकारी संचालक नितीन भोसले यांनी केले. शेवटी आभार कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव दंडवते यांनी मानले. सांगते निमित्त संचालक मधुकर सातव व सौ. कल्पनाताई व संचालक महेंद्र गोर्डे व सौ. मनिषाताई यांच्या हस्ते सत्यनारायण पुजा संपन्न झाली.
याप्रसंगी संचालक बाबासाहेब डांगे, अॅड. संदिप गोंदकर, भगवानराव टिळेकर, गंगाधर डांगे, संपतराव हिंगे, नानासाहेब नळे, महेंद्र गोर्डे, बाळासाहेब चोळके, विष्णुपंत शेळके, आलेश कापसे, अरविंदराव फोपसे, संपतराव चौधरी, बलराज धनवटे, अनिल गाढवे, मधुकर सातव, ज्ञानेश्वर चोळके यांचेसह अनिल शेळके, नितीन एलम, अनिल बोठे, गणपत धरम, भिमराज शिंदे, योगेश निर्मळ, संजय जेजुरकर, ज्ञानेश्वर गाडेकर, निलेश कार्ले, ज्ञानदेव शेळके यांचेसह सभासद, ऊसउत्पादक खातेप्रमुख, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मका पासुन इथेनॉल..
गणेश कारखान्यात इथेनॉल निर्मिती सुरु करण्याचा विचार आहे. शेतकर्यांकडून मका खरेदी करुन इथेनॉल निर्मिती करु, मागील दोन वर्षात कारखाना चांगला चालविला. पुढे ही चांगला चालेल, गणेशचे नाव जिल्ह्यात होईल असा कारखाना आपण चालवू असेही विवेक कोल्हे म्हणाले.
स्व. कोल्हेे यांची स्मृर्ती प्रेरणादायी..
काल स्वर्गिक शंकरराव कोल्हे यांची पुण्यतिथी असल्याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. थोरात म्हणाले, ते मंत्री असताना आपण आमदार होतो. स्व. कोल्हे हे दिलदार व्यक्तिमत्व होते. साखर कारखान्याचे सर्वच चेअरमन तांत्रिक माहिती असेलच असे नसतात. परंतु स्व. कोल्हे यांना साखर कारखानदारीची तांत्रिक माहिती चांगली होती. म्हणुनच त्यांनी ऊसाच्या मळीपासुन काय काय तयार करता येते ते जाणले. कुणालाही कल्पना येणार नाही, असे उपपदार्थ संजिवनीने तयार केले. कोल्हे यांनी विविध प्रयोग संजीवनीत केले. मंत्रालयातील अनुभव सांगत थोरात म्हणाले, आमदारांना कसे सांभाळावे हे आपण पाहिले. एखाद्या आमदाराचे काम मंत्र्यांकडे असेल तर जिल्ह्यातील सर्व आमदारांना एकत्र करुन ते त्या मंत्र्याकडे जात असत, व काम करुन घेत असत. त्यांची स्मृर्ती प्रेरणा दायी असल्याच्या आठवणी त्यानी सांगितल्या.