महिलांना साक्षरतेबरोबर आर्थिक साक्षर करणे ही काळाची गरज

संगमनेर Live
0
महिलांना साक्षरतेबरोबर आर्थिक साक्षर करणे ही काळाची गरज

◻️ सौ. दुर्गाताई तांबे यांचे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन 

संगमनेर LIVE | पुरुष घराच छत असेल तर महिला खांब आहे. संसाररूपी रथाच्या दोन चाकापैकी एक चाक महिला आहे. आयुष्याचयुद्ध खेळताना पुरुष दांडपट्टा असेल तर महिला समशेर आहे. अशा महिलांच्या कर्तुत्वावर स्तुतीसुमने उधळत सौ. दुर्गाताई तांबे यांनी हसत खेळत महिला दिनाच्या निमित्ताने सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयातील प्राध्यापिका आणि विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन केले. 

आपल्या भाषणात पुढे त्यांनी महिलांनो! आपले कर्तव्य कधीच विसरू नका, मात्र वय विसरून स्वच्छंदीपणे जगत जीवनाचा मनमुराद आनंद लुटायला कधीच विसरू नका असा मोलाचा सल्ला दिला.

महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ यांनी महिलांना त्यांच्या हक्काची व संवैधानिक कायद्याची माहिती व्हावी म्हणून लोकशाहीचेगाईड ही पुस्तिका भेट दिली. आपल्या स्वागतपर भाषणात प्राचार्यांनी विद्यार्थिनींना आणि प्राध्यापिकांना स्व-संरक्षणार्थ सज्ज होण्यासाठी कायद्याची पुस्तिका हीच आधाराची काठी म्हणून देत आहोत असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एकविरा फाउंडेशन आयोजित मुलींच्या रस्सीखेच व क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकावला त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. विलास कोल्हे, आयक्यूएसी समन्वय डॉ. लक्ष्मण घायवट, सामाजिक कार्यकर्ता अनिकेत घुले, ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. शोभा बोऱ्हाडे, डॉ. प्रमोदिनी नवले आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. लक्ष्मणघायवट यांनी केले तर आभार डॉ. स्वाती ठुबे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. स्नेहलता थिटमे यांनी केले.

दरम्यान या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. कोमल म्हस्के, प्रा. रेश्मा साबळे, प्रा. अरुंधती देशमुख, प्रा. मोनिका आंबरे, प्रा. गीता नवले यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !