संगमनेर तालुक्यांच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध - मंत्री विखे पाटील
◻️ वीज वितरण कंपनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आढावा बैठक संपन्न
◻️ अनेक वर्ष काही करता न आलेले सर्व भावी जनतेन घरात बसवले
संगमनेर LIVE | जनतेचे पाठबळ आणि कार्यकर्त्याच्या मेहनतीन राज्यात महायुतीला बहुमत मिळाल आहे. शासकीय पदाधिकाऱ्यानी जनतेचा आणि महायुतीच्या प्रत्येक कार्यकरत्याचा सन्मान ठेवून काम केले पाहीजे. संगमनेर तालुक्याचा विकास आता कोणी रोखू शकणार नाही. योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि विकास कामांना भरीव निधी उपलब्ध झाल्याने इतरांनी चिंता करण्याचे कारण नाही. महायुती सरकार सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
तालुक्यातील वीज वितरण कंपनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी अधिकारी आणि महायुतीचे पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत घेतला. आमदार अमोल खताळ, अतिरीक्त जिल्हाधिकरी बाळासाहेब कोळेकर, प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, तहसिलदार धीरज मांजरे, वीज वितरण कंपनीचे अभियंता थोरात, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सर्व अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
सर्व गावांचा आढावा घेतल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी विधानसभा अधिवेशना नंतर आ. अमोल खताळ आणि सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रित दौरा करून पुन्हा जलजीवन मिशनच्या कामाचा आढावा घ्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी आशा योजनेत काही त्रृटी राहील्या असतील, ठेकेदारांनी चुका केल्या असतील, त्याची स्वतंत्र चौकशी होईल. पण पाणी पुरवठा योजनाना गावातील राजकारणात अडकवू नका असे आवाहन करून जलजीवनचे काम म्हणजे भविष्यातील पिढीच्या दृष्टीने टाकलेले मोठे पाउल असल्याचे विखे पाटील म्हणाले.
वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी परस्पर निर्णय करू नका. कृषी तसेच पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा सुरळीत कसा होईल याचा गांभिर्याने विचार करावा असे निर्देश देतानाच सौरपंप आणि घरकुर योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे आवाहन करतानाच संगमनेर तालुक्यात सहा हजार घरकुल मंजूर झाली असल्याची माहीती विखे पाटील यांनी दिली.
राज्यात युती सरकार येवून शंभर दिवस झाले आहेत पण अनेकांना चिंता लागून आहे. अनेक वर्ष काही करता आले नाही असे सर्व भावी जनतेन घरात बसून टाकले आहेत. अनेक वर्ष तालुका माफीयांच्या ताब्यात होता. आता तालुका त्यांच्यापासून स्वतंत्र झाला असून तालुक्यातील प्रश्नाची चिंता करण्यासाठी महायुती सक्षम असल्याचे विखे पाटील म्हणाले.