प्रतापपूर येथे संगीत श्रीमत भागवत महापुराण कथेचे आयोजन
◻️ श्री शनि महाराज मंदिर वर्धापनदिनानिमित्त ग्रामस्थांचा उपक्रम
◻️ पंचक्रोशीतील भाविकांना महापुराण कथेचा लाभ घेण्याचे आवाहन
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथील श्री शनि महाराज मंदिर वर्धापनदिनानिमित्त ग्रामस्थांनी भव्य संगीत श्रीमत भागवत महापुराण कथेचे रविवार दि. २ मार्च ते रविवार दि. ९ मार्च २०२५ दरम्यान श्री क्षेत्र मानमोडे बाबा मंदिर प्रांगणात आयोजन केले आहे. मंगलमय वातावरणात सुरू असलेल्या या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आहे.
यावेळी श्रीमद भागवत कथान्यास ह.भ.प. माऊली महाराज सालगांवकर (आळदी देवाची) यांच्या अमृततुल्य वाणीतून श्रीमत भागवत महापुराण कथा ऐकण्यास मिळत आहे. यामध्ये रविवारी (दि. ०२) भागवत महात्म. सोमवारी (दि. ०३) नारद - व्यास संवाद, परिक्षित जन्म व शुक भेट. मंगळवारी (दि. ०४) शुक परिक्षित संवाद व कपिलगीता. बुधवारी (दि. ०५) ध्रुव चरित्र व प्रल्हाद चरित्र.
गुरुवारी (दि. ०६) समुद्र मंथन, रामचरित्र, कृष्णजन्म. शुक्रवारी (दि. ०७) बालचरित्र, गोवर्धन लिला व रुख्मिणी स्वयंवर. शनिवारी (दि. ०८) सुदामा चरित्र, स्वधामलिला व परिक्षित उध्दार महापुराण या कथा दररोज सायंकाळी ७.३० सांगितली जाणार असून त्यानंतर भाविकांना महाप्रसाद दिला जाणार आहे. तसेच दैनंदिन सकाळी श्री शनि लिलामृत पारायण देखील सुरू राहणार आहे.
दरम्यान रविवार दि. ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ वा. ह.भ.प. माऊली महाराज सालगांवकर यांचे काल्याचे किर्तन पार पडणार असून त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे या भव्य श्रीमत भागवत महापुराण कथेचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा. असे आवाहन प्रतापपूर ग्रामस्थ आणि शनैश्वर भक्त गण यांनी केले आहे.