धांदरफळला शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिरात ६१ रक्तदात्यांचे रक्तदान
◻️ शिवशंभो परिवार आणि निमा संघटनेचा सामाजिक उपक्रम
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे शहीद दिनाचे औचित्य साधत शिवशंभो हॉस्पिटल आणि निमा संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ६१ रक्तदात्यांनी रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे असे मानून रक्तदान केले.
संगमनेर निमा संघटना शिवशंभो हॉस्पिटल, जनसेवा फाऊंडेशन, भाजपा वैद्यकीय आघाडी, शिवशंभो परिवार, महायुती व अर्पण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपा वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्राचे सहसंयोजक डॉ. महेंद्र कोल्हे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या यारक्तदान शिबिराचे उद्घाटन आ. अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर भाजपचे तालुका अध्यक्ष वैभव लांडगे, रमेश काळे, दादाभाऊ गुंजाळ, बंडूनाना देशमुख, कपिल पवार, आबासाहेब थोरात, निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. अमोल वालझाडे, डॉ. विकास करंजेकर, डॉ. सागर फापाळे, डॉ. शरद गुंजाळ आदी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रक्तदात्यांचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रवासी बॅग देऊन सन्मान करण्यात आला. या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिव शंभो हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. महेंद्र कोल्हे, राजेंद्र देशमुख, अविनाश वलवे, भारत नाइकवडी, किरण तोरकडी, प्रदीप डेरे, शरद कवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
समाजासाठी, राष्ट्रासाठी आणि गरजूंना जीवनदान देणाऱ्या रक्तदात्यांसाठी विविध संघटनांनी एकत्र ऐऊन राबवलेला सामाजिक उपक्रम हा प्रेरणादायी आहे. रक्तदान ही खरी मानवसेवा असून, अशा विधायक कार्यामध्ये सहभागी होऊन रक्त दानासाठी इतर रक्तदात्यांनाही प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. समाजात सेवावृत्ती अधिक बळकट व्हावी, तरुणांनी रक्तदानासारख्या पवित्र कार्यात पुढाकार घेण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.