प्रवरेच्या आश्‍वी महाविद्यालयात व्यसनमुक्ती जनजागृती अभियानाचे आयोजन

संगमनेर Live
0
प्रवरेच्या आश्‍वी महाविद्यालयात व्यसनमुक्ती जनजागृती अभियानाचे आयोजन

◻️ आठवडे बाजारादिवशी व्यसनमुक्ती निर्मूलन रॅली काढत केले प्रबोधन 

◻️ तंबाखूजन्य पदार्थ विक्री करु नये यासाठी दिले दुकानदारांना निवेदन

संगमनेर LIVE | प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संगमनेर तालुक्यातील आश्‍वी खुर्द येथील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक शास्त्र महाविद्यालयात ‘व्यसनमुक्ती जनजागृती अभियान’ कॅम्पस डायरेक्टर डॉ. महेश खर्डे. प्राचार्य प्रा. देविदास दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले.

यामध्ये विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, कमवा व शिका योजना  या विभागांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांनी व्यसनमुक्तीची सामुहिक शपथ घेतली. तसेच महाविद्यालय परिसरात आठवडे बाजार दिवशी व्यसनमुक्ती निर्मूलन रॅली काढून जनजागृती व प्रबोधन केले. 

यावेळी महाविद्यालय परिसरातील दुकानदारांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री न करण्यासाठी निवेदन देण्यात आले. या व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीमध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थिनी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, कमवा व शिका योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

दरम्यान हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रा. गणेश शेळके, प्रा. निलेश पर्वत, प्रा. अमित शिंदे, डॉ. प्रमोद विखे, प्रा. वैभव गायकवाड व प्रा. दिपाली तांबे यांनी परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !