१ हजार ५०० स्क्वेअर फुटापर्यत शास्तीकर माफ करा - आमदार सत्यजित तांबे

संगमनेर Live
0
१ हजार ५०० स्क्वेअर फुटापर्यत शास्तीकर माफ करा - आमदार सत्यजित तांबे

◻️ ३ हजार ९६४ अनधिकृत निवासी मालमत्तांचा मुद्दा ऐरणीवर

◻️ मंत्री उदय सामंत यांचा मागणीला सकारात्मक प्रतिसाद



संगमनेर LIVE | राज्यातील मध्यमवर्गीय आणि गोरगरीब नागरिकांना दिलासा देण्यासाठी १ हजार ५०० स्क्वेअर फुटपर्यंतच्या घरांना शास्तीकर माफ करावा. शास्तीकरामुळे सर्वसामान्य नागरिकांवर वाढता आर्थिक बोजा पडत असून त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा. अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत केली.

मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार तांबे म्हणाले की, अनेक कुटुंबे आपल्या कष्टाच्या पैशातून घर घेतात. मात्र करांमुळे त्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागतो. जर सरकारने शास्तीकर माफ केला. तर मध्यमवर्गीय आणि कष्टकरी नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. सध्या ६०० स्क्वेअर फुटपर्यंत शास्तीकर माफ आहे. तर ६०० ते १००० स्क्वेअर फुटपर्यंत ५० टक्के सवलत देण्यात आली आहे.

मात्र त्याऐवजी १,५०० स्क्वेअर फुटपर्यंत शास्तीकर पूर्ण माफ करावा आणि १,५०० ते २००० स्क्वेअर फुटपर्यंत ५० टक्के कर माफ करावा. संगमनेर शहरातील ३ हजार ९६४ अनधिकृत निवासी मालमत्तांचा मुद्दा उपस्थित केला. या घरांमध्ये कोणताही व्यावसायिक उपक्रम नाही. त्यामुळे या रहिवाशांवर शास्तीकर लादणे अन्यायकारक आहे, असे त्यांनी सांगितले. 

सरकारने या नागरिकांना दिलासा द्यावा आणि शास्तीकर पूर्णपणे माफ करावा. मंत्री उदय सामंत यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. १,५०० स्क्वेअर फुटापर्यंत शास्तीकर पूर्ण माफ करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल. अशी घोषणा मंत्री सामंत यांनी केली असे ही आमदार तांबे यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !