अश्‍वारूढ पुतळा वाढीव जागेचा प्रश्न सोडविण्यास परिवहन मंत्री सकारात्मक

संगमनेर Live
0
अश्‍वारूढ पुतळा वाढीव जागेचा प्रश्न सोडविण्यास परिवहन मंत्री सकारात्मक

◻️ आमदार अमोल खताळ यांची माहिती 

◻️ मुंबईतील विधान भवनात आयोजित परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

संगमनेर LIVE | संगमनेर बसस्थानकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याच्या वाढीव जागेसह बसस्थानकातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मुंबई येथील विधान भवनात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक व परिवहन विभागाच्या अधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सकारात्मकता दर्शविली असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

संगमनेर बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा आणि इतर समास्या मांडण्यात आल्या. तसेच, अकोले आणि संगमनेर तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी संगमनेरला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. परिवहन कार्यालय बाबत लवकर धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे परिवहन मंत्री यांनी आमदार खताळ यांना आश्‍वस्त केले. नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा विनंती यावेळी करण्यात आली.

संगमनेर आगारासाठी २० नवीन बसेस देऊन ग्रामीण भागात मुक्कामी बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. लवकरच १० नवीन बसेस संगमनेर येथे मिळतील असे मंत्री महोदय यांनी सांगितले. तसेच, व्यापारी संकुलात दिव्यांग बांधवांसाठी ३ टक्के गाळे वाटप करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.

संगमनेर बीओटी व्यापारी संकुलाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्तावही बैठकीत ठेवण्यात आला. या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून, आमदार अमोल खताळ यांनी या मागण्या लावून धरल्या आहेत तसेच यावर आणि लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.

संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली. जनतेच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, लवकरात लवकर अंमलबजावणी होण्यासाठी ठोस पावले उचलली जातील. संगमनेरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला साजेसा विकास व्हावा, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी प्रामाणिकपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला. 

दरम्यान हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रशासन स्तरावर सातत्याने पाठ पुरावा करून संगमनेरच्या जनतेला सुविधा मिळवून देण्यात येतील असे यावेळी आश्वासन दिले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !