संगमनेर शहरातील बस स्थानक परिसरात महायुतीच्या वतीने निदर्शने
◻️ उपमुख्यमंत्री शिंदे यांची बदनामी करणाऱ्या कुणाल कामरावर कारवाई करण्याची मागणी
संगमनेर LIVE | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची कुणाल कामरा याने मुंबई येथे एका कार्यक्रमात गीत सादर करत बदनामी केली. असा आरोप करत संगमनेर येथे आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली बस स्थानक परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यानी निदर्शने केली व प्रतीकात्मक प्रतिमेला ‘जोडे मारो आंदोलन’ देखील केले.
कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या स्तरावर टीका केली असल्याचा आरोप उपस्थित कार्यकर्त्यानी केला. यावेळी बसस्थानक प्रवेशद्वाराजवळ कुणाल कामरा यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘जोडे मारो आंदोलन’ करत निषेध केला.
त्याचबरोबर कुणाल कामरा यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी आ. अमोल खताळ यांचे बंधू राहुल खताळ, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, रमेश काळे, राजेंद्र सोनवणे, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, दिनेश फटांगरे, रणजीत ढेरंगे, समीर ओझा, अंकुश राहाणे, सौरभ देशमुख, समीर ओझा, रिपाइंचे कैलास कासार, कृष्णा हासे, भाजपचे सरचिटणीस राहुल भोईर, भाजप युवा मोर्चाचे शशांक नामन, महेश जगताप, अजित जाधव, संदेश देशमुख, वरद बागुल, सुयोग जोंधळे, सुशील शेवाळे, बाळासाहेब व्यवहारे, यश डावखरे, यश धारणकर, रणजित गायकवाड सह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.