उंबरी बाळापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
◻️ चिमुकल्यांचा नृत्याविष्कार, विनोदी नाटक आणि विविध गीतांवर उपस्थिताकडून टाळ्याचा कडकडाट
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात नुकतेच पार पडले. यावेळी चिमुकल्यांनी सादरीकरन केलेल्या अप्रतिम नृत्याविष्कार, विनोदी नाटक, विविध गीताना उपस्थित ग्रामस्थं व पालकांनी टाळ्याचा कडकडाट करत प्रतिसाद दिला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने शालेय विद्यार्थ्याच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी शाळेच्या प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी सुरवातीला देवी सरस्वतीचे पुजन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली. यानंतर स्वागतगीत व गणपती आरतीचे सादरीकरण झाले.
यावेळी लल्लाटी भंडार, बाईपण भारी देवा!, चाकर शिवबाचे होणार, मल्हारी - मल्हारी, पोते नृत्य, कुंकू लावील रमान, झुबी - झुबी, आई तुझा डोंगर, माय भवानी, कशी मी जाऊ, लुंगी नृत्य, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मिक्स गाणी, नशीबाचा वडापाव या गाण्यावर चिमुकल्यांनी उपस्थिताना नृत्य करायला भाग पाडले.
तर, यानंतर सादर झालेल्या सासु - सुनेचे विनोदी नाटक पाहुन ग्रामस्थ व पालक पोटधरून हासले. यावेळी शेतकरी नृत्य, सांगा मी कशी दिसते, विनोदी गाणे, खंडोबाची कारभारीन, पापा मेरे पापा या गाण्याबरोरचं प्रबोधनपर नाटकाने उपस्थिताना विचार करायला भाग पाडले.
तसेच दर्या किनारे, मुळींच नव्हते रे, पुष्पा रिमिक्स, पिचंली माझी बांगडी, टिपरी गाणे, छम - छम, माऊली - माऊली आणि बैलगाडा शर्यत या गाण्याच्या सादरीकरणामुळे उपस्थिताचा आनंद द्विगुणित झाला होता. याप्रसंगी मैया यशोदा, काटा लगा व एक - दो - तीन - चार हे गाणे सादर करणाऱ्या चिमुकल्यांनी वाह - वाह मिळवली.
मुख्याध्यापिका विजया भुसाळ, शिक्षक रामराव देशमुख, नानासाहेब देव्हारे, वैशाली पाबळ यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले होते. तर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत भुसाळ, योगेश डोखे, प्रवीण सारबंदे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी, शाळेच्या विविध समित्याचे सदस्य यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. तर, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विवेक डोखे यांनी केले.
दरम्यान याप्रसंगी सरपंच अर्चना भुसाळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला आकर्षक मंडप, साऊंड सिस्टीम आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे कार्यक्रमाला भव्य स्वरुप प्राप्त झाल्यामुळे ग्रामस्थ व पालकांनी कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.